Shravan Festival Recipes : तीज, नागपंचमी आणि रक्षाबंधनला ट्राय करा स्वीट डिश; रेसिपी पाहून तोंडाला पाणी सुटेल

Nag Panchami Recipe : तुम्हाला तेच तेच गोडाचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर या रेसिपी नक्की ट्राय करुन पाहा.
Shravan Festival Recipes
Shravan Festival RecipesSaam tv
Published On

Raksha Bandhan Recipe : श्रावण महिना म्हटलं की, अनेक सणांची सुरुवात सुरु होते. या महिन्यात अनेक गोडाधोडाचे पदार्ख चवीने खाल्ले जातात. तुम्हाला तेच तेच गोडाचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर या रेसिपी नक्की ट्राय करुन पाहा.

ऑगस्ट महिन्यात तीज, नागपंचमी आणि रक्षाबंधन हे तीन सण आल्यामुळे नेमके कोणते गोड पदार्थ आपण बनवायला हवे हा प्रश्न सगळ्यांना पडतो. नेहमीचेच पदार्थ बनवण्याऐवजी आम्ही तुम्हाला काही पर्यायी पदार्थ सुचवत आहोत. सणांच्या काळात मिठाईच्या दुकानात घेवर, फेणी आणि अनारसे आपल्याला पाहायला मिळतात. पाहूयात रेसिपी

Shravan Festival Recipes
Shravan Recipe 2023 : श्रावणात नैवेद्यासाठी स्वीट डिश बनवायचा आहे? ट्राय करा पौष्टिक तिळाची खीर, पाहा रेसिपी

1. घेवर

राजस्थानची सगळ्यात प्रसिद्ध डिश घेवर. घेवर बनवण्यासाठी आपल्याला प्रामुख्याने चण्याचे पीठ, साखरेचा (Sugar) पाक, तूप आणि पिस्ते आणि केसर यांपासून ते बनवले जातात. बनवताना त्याची योग्य पडणारी जाळी व ड्रायफ्रुट्सने (Dry Fruits) सजवल्यास खाण्याचा मोह आवरत नाही.

2. फेणी

रव्यापासून बनवलेल्या फेणीचा साखर नसलेला प्रकार वर्षभर उपलब्ध असला तरी, पांढरी फेणी, बदामाच्या कापांसह, फक्त पावसाळ्यात तयार केली जाते. मैद्यापासून बनवलेल्या मऊ आणि अत्यंत बारीक तारांना एकत्रित केले जाते. कमी गोडाचा पदार्थ सणाला अधिक गोड करतो.

Shravan Festival Recipes
Famous Travel Places In Vasai : मुंबईजवळच्या निसर्गात हरवून जायचंय; वसईतील पर्यटनस्थळे घालतील भुरळ!

3. अनारसे

अनारसे हे प्रामुख्याने दिवाळी बनवले जातात. परंतु, सण उत्सव म्हटलं की, अनारसे हे हमखास पाहायला मिळतात. सोनेरी-तपकिरी तादंळाच्यात पिठाच्या गोळ्यांना खुसखुशीत लाटून तुपात तळले जाते. बाहेरुन कुरकुरीत व आतून मऊ अनारसे सणावारात (Festival) अधिक चवीने खाल्ले जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com