Fish Good For Eyes: मासे खाल्ल्याने खरंच डोळे ऐश्वर्या रायसारखे सुंदर होतात का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

कोमल दामुद्रे

विधान

भाजपचे मंत्री विजयकुमार गावित यांचे विधान चर्चेत आले आहे.

मासे

गावित यांनी एका कार्यक्रमात बोलत असताना विश्वसुंदरी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचे डोळे हे मासे खाल्ल्यामुळे सुंदर झाले असल्याचे म्हटले आहे.

सुंदर

पण खरेच मासे खाल्ल्याने डोळे सुंदर होतात का? जाणून घेऊया

संशोधन

संशोधनात असे आढळून आले आहे की, आठवड्यातून किमान दोन वेळा रावस आणि ट्यूना फिश खाल्ल्याने डोळ्यांचे आजार टाळता येऊ शकतात.

फायदा

वाढत्या वयानुसार आपले स्नायू कमकुवत होऊ लागतात. ज्यामुळे अंधत्व येऊ शकते अशावेळी मासे हे फायदेशीर ठरु शकतात.

युनिव्हर्सिटी

टफ्ट्स युनिव्हर्सिटीच्या मते, माशांमध्ये आढळणारे ओमेगा 3 फॅटी ऍसिड डोळ्यांच्या आजारापासून संरक्षण देते.

आरोग्य

माशांमध्ये व्हिटॅमिन सी आणि ई आणि बीटा-कॅरोटीन यांसारख्या अँटिऑक्सिडंट्सचा समावेश आहे ज्याच्या सेवनाने डोळ्यांचे आरोग्य सुधारते.

मेंदूचे आरोग्य

मेंदूची वाढ आणि विकासासाठी ओमेगा ३ फॅटी ऍसिडस् आवश्यक आहेत

हृदयाचे आरोग्य

फॅटी ऍसिडस् उच्च रक्तदाबाचा धोका कमी करून हृदयाचे संरक्षण करण्यात मदत करतात.

कर्करोगपासून बचाव

मासे व संबंधित उत्पादने व्हिटॅमिन डीचे सर्वोत्तम स्रोत आहेत. त्वचेच्या पेशींच्या पडद्याला मजबूत करण्यास मदत करतात आणि त्वचेच्या कर्करोगाच्या काही प्रकारांचा धोका देखील कमी करू शकतात.

Next : मुंबईजवळच्या निसर्गात हरवून जायचंय; वसईतील पर्यटनस्थळे घालतील भुरळ

येथे क्लिक करा