Knowledge News : लिफ्टमधे आरसा का असतो, तुम्हाला माहितीये का? ही आहेत ४ कारणं

Knowledge : आपल्यापैंकी प्रत्येकजण ज्या सोसायटीमध्ये राहतो. त्या बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये आरसा असलेला तुम्ही पाहिल असेल. मात्र कधी तुम्ही विचार केला आहे का? लिफ्टमधे आरसा का असतो?
Knowledge
Knowledge NewsSaam Tv
Published On

लिफ्टचा वापर गेल्या काही दशकांपासून सर्वच शहरी निमशहरी भागात मोठ्याप्रमाणावर होतोय. इमारत कोणत्याही शहरात, काळात बांधली असेल तरीही आरसा आणि संगीत बहुेक ठिकाणी असतंच. यामागे काय कारणे असावीत याचा शोध घेतला असता जे समोर आलंय ते मांडते.

Knowledge
General Knowledge News: मिलियन, बिलियन आणि ट्रिलियनमध्ये किती असतात शून्य? सहज समजून घ्या '0' चं गणित...

आपल्याला माहितीच आहे की वय काहीही असलं किंवा अवतार कसाही असला तरी आपल्याला आरशात पाहायला आवडतं. सौंदर्यशास्त्राच्या सिद्धांतानुसार आपल्या आरशात दिसणाऱ्या प्रतिमेवर सर्वच खुश असतो. या आरशात आपण पाहत राहिल्याने आपण उद्वहनात प्रवेश केल्यापासून इच्छित मजल्यावर पोहोचे पर्यंतचा वेळ आपल्याला जाणवत नाही. हा प्रतीक्षा कालावधी सुकर होतो.

दुसरा मुद्दा येतो तो स्पेस चा. उदवाहानाच्या मर्यादेनुसार जागा कमी असते. कमी जागेत सर्व बाजूनी बंद असताना काही जणांना कोंडल्यासारखे वाटते. अशावेळी आरसा असल्याने जागा मोठी आणि प्रशस्त वाटते. इथला प्रकाशही कमी असल्यास आरश्यातून परावर्तीत जागा (place)प्रकाशमान होते.

आपल्याला एखाद्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वी आपण कसे दिसतोय हे तपासण्यासाठी आरसे आपल्याला मदत करतात. विस्कटलेले केस(hair) किंवा साकळून आलेला घाम टिपण्यास या आपल्या प्रतिमेची मदत होते.

क्लॉस्ट्रोफोबियाबद्दल तुम्हाला माहिती असेल तर ही भीती (fear)आणि चिंता कमी करण्यासाठी या आरशातून दिसणाऱ्या अगणित प्रतिमांची आपल्याला मदत होते.ही व अशी अनेक कारणं या आरसा लावण्यामागे असतात. व ती सर्व वापरकर्त्यांच्या फायद्यासाठीच असतात असे म्हंटले तरी वावगे ठरत नाही. यापुढे तुम्ही जेव्हा लिफ्टमधून प्रवास कराल तेव्हा इतरही काही कारणे आहेत का याचा विचार करा.

Knowledge
Knowledge: बापरे..! 'या' देशात बर्फासाठी मोजावे लागतात हजारो रूपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com