Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग; या जिल्ह्यातील सर्व जागांचीही केली घोषणा? राज्यात किती जागा लढवणार?

Maharashtra Assembly Election : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बुलढाणा जिल्ह्यातील विधानसभेच्या ६ जागा लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Ravikant Tupkar
Ravikant TupkarSaam Digital
Published On

राज्यात ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. राजकीय पक्षांकडून त्याची आतापासून तयारी सुरू झाली असून वातावरणही तापू लागलं आहे. दरम्यान शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याचं तुपकर यांनी म्हटलं आहे. आजपासून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

निवडणुकीसंदर्भात आज रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची आज बैठक झाली. या बैठकीत जिल्ह्यातील बुलढाणा, चिखली, सिंदखेड राजा, खामगाव, जळगांव जामोद , मेहकरमध्ये स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. तर 13 किंवा 14 जुलैला पुणे येथे राज्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे आणि राज्यात कुठे कुठे विधानसभा लढायची ते ठरवणार आहे.

शिवाय राज्यातील , जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिकात सुद्धा उमेदवार उभे करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या सोबत या संदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही . मात्र स्वाभिमानी सोडली नसल्याचं ते म्हणाले.

Ravikant Tupkar
Nanded Breaking News : टिप्परच्या धडकेत रिक्षाचा चुराडा; एक ठार, ७ गंभीर जखमी, ५ मुक्या प्राण्यांचाही गेला जीव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com