Coconut : नारळातून खोबरं काढताना हात दुखतात? ही सोपी ट्रिक वापरा, करवंटीला नाही चिकटणार खोबरं

Kitchen Hacks : भारतीय पदार्थ नारळाशिवाय अपूर्ण आहे. मात्र नारळ फोडताना आणि जास्तीचे उरलेले खोबरे स्टोअर करताना गृहिणींचा गोंधळ उडतो. या सिंपल टिप्समुळे मिनिटांत मलाईदार खोबरे मिळेल आणि ते दीर्घकाळ टिकेल.
Kitchen Hacks
Coconut SAAM TV
Published On

अनेक घरात नारळाशिवाय स्वयंपाक अशक्य असतो. गोवा, कोकणात नारळाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पदार्थांची चव नारळ वाढवते. पण अनेकांसाठी नारळ फोडणे, किसणे तसेच तो दीर्घकाळासाठी स्टोअर करणे हे मेहनतीचे काम असते. ओल्या नारळामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो त्यामुळे तो जर तुम्ही फोडून स्टोअर करत असाल तर त्याची विशेष काळजी घेतली पाहिजे कारण तो लवकर बुरशी लागून खराब होतो. यामुळे नारळ(Coconut) खरेदी करण्यापासून ते खोबरे स्टोअर करण्यापर्यंत सर्व टिप्स जाणून घ्या.

नारळ खरेदी करताना 'या' गोष्टी लक्षात घ्या

  • नारळाचे खोबरे जास्त दीर्घकाळ टिकवण्यासाठी 'नारळ खरेदी करताना फ्रेश आहे का?' याची खात्री करावी. मगच विकत घ्यावा.

  • जास्त पाणी असलेला नारळ कधी पण खरेदी करावा.

नारळाचे पाणी कसे स्टोअर करावे?

जर तुम्हाला नारळ पाणी जास्त काळ टिकवायचे असल्यास ते सर्वप्रथम गाळणीने गाळून घ्या आणि फ्रिजमध्ये बर्फाचे क्युब्स करून ठेवून द्या. यामुळे नारळाच पाणी नीट स्टोअर होईल.

नारळातून खोबरे कसे काढावे?

फोडलेला नारळ एक दिवस तसाच फ्रिजमध्ये ठेवून द्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एका भांड्यात पाणी गरम करून छान उकळून घ्या आणि त्यामध्ये फ्रिजमध्ये नारळाच्या वाट्या १० ते १५ मिनिटे उकळवा. त्यानंतर नारळाची वाटी पाण्यातून बाहेर काढा. त्यानंतर वाटी थोडी थंड झाल्यावर सूरीच्या मदतीने त्यातील खोबरं काढून घ्या. यामुळे नारळातील संपूर्ण खोबरं अलगद बाहेर येईल तसेच ते करवंटीला लागणार नाही.

Kitchen Hacks
Weight loss tips : ३ महिन्यात १० किलो वजन कमी होईल; फॉलो करा ७ टिप्स

खोबरं दीर्घकाळ कसे स्टोअर करावे?

वरील पद्धतीने खोबरं काढा आणि खोबऱ्याचे बारीक तुकडे करून तुम्ही फ्रिजमध्ये हवाबंद डब्यामध्ये ठेवा. यामुळे खोबरं दीर्घकाळ टिकेल. नारळ एकदाच फोडून छान खवून घेऊन तुम्ही त्याचा किस देखील स्टोअर करू शकता. यासाठी तुम्ही झिप लॉक बॅगचा वापर करा. नारळाचा किस करून छोट्या झिप लॉक बॅगमध्ये भरून ठेवा आणि गरजेनुसार वापरा. तसेच तुम्ही खोबऱ्याचा किस करण्यासाठी मिक्सरचा देखील वापर करू शकता. खोबऱ्याचे तुकडे मिक्सला लावून तयार झालेला किस हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करा.

Kitchen Hacks
High Cholesterol: नसांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढल्यावर पायांमध्ये दिसतात 'हे' बदल; 90 टक्के लोकं करतात इग्नोर!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com