High Cholesterol: नसांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढल्यावर पायांमध्ये दिसतात 'हे' बदल; 90 टक्के लोकं करतात इग्नोर!

Signs Of High Cholesterol In Legs: शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे अनेक समस्या मागे लागू शकतात. अशावेशी वाढलेल्या कोलेस्ट्रॉलची काही लक्षणं तुमच्या पायांमध्ये दिसून येतात. जाणून घेऊया ही लक्षणं नेमकी काय आहेत.
High cholesterol symptoms
High cholesterol symptomsYandex
Published On

चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे आपल्यामागे अनेक आजार लागले आहेत. यामध्ये हाय कोलेस्ट्रॉलचा देखील समावेश आहे. कोलेस्ट्रॉल हा मेणासारखा एक पदार्थ आहे. मुळात कोलेस्ट्रॉल दोन प्रकारचे असून त्यामध्ये चांगलं कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल यांचा समावेश आहे.

ज्यावेळी एखाद्या व्यक्तीच्या शरीरात खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते तेव्हा ते नसांमध्ये जमा होऊ लागतं. परिणामी हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या नसा ब्लॉक होऊ लागतात. अशावेळी हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि कोरोनरी हार्ट डिसीज यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. (Signs Of High Cholesterol In Legs)

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोलेस्ट्रॉलची पातळी नियमितपणं फार गरजेचं आहे. कोलेस्ट्रॉल वाढलं की, शरीरात अनेक प्रकारची लक्षणं दिसून येतात. यापैकी काही लक्षणे पायांमध्ये देखील दिसू शकतात. ही लक्षणे वेळीच ओळखली तर कोलेस्ट्रॉलची समस्या टाळता येऊ शकते. ही लक्षणं नेमकी काय आहेत ती पाहूयात.

High cholesterol symptoms
Weight Loss Tips : एकाच वेळी ही सहा कामे केल्यास वाढलेली ढेरी गायब होईल; बारीक व्हायचंय तर आजपासूनच सुरुवात करा

पायांमध्ये वेदना होणं

पाय दुखणं आणि क्रॅम्प्स येणं हे उच्च कोलेस्ट्रॉलचं एक लक्षण असण्याची शक्यता आहे. ज्यावेळी पायांच्या धमन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होतं त्यावेळी रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. परिणामी पाय दुखू लागतात. अशावेळी जर तुम्हाला पायात तीव्र वेदनांसोबत तुम्हाला जडपणा जाणवत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

जखम भरण्यास वेळ लागत असेल

शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्यामुळे जखमा भरण्यास जास्त वेळ लागू शकतो. याशिवाय हात आणि पायांच्या जखमा बऱ्या होण्यास विलंब होऊ शकतो. ही समस्या इतर अनेक कारणांमुळे देखील उद्भवू शकते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

पाय सुन्न पडणं

पायात मुंग्या येणं किंवा सुन्न होणं हे देखील उच्च कोलेस्ट्रॉलचं एक लक्षण मानलं जातं. शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे पायांमध्ये रक्तप्रवाह योग्य पद्धतीने होत नाही, त्यामुळे पायात सुन्नपणा आणि मुंग्या येण्याची समस्या वाढू शकते.

पायांच्या त्वचेच्या रंगात बदल होणं

रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढलं की पायांच्या त्वचेचा रंग अचानक बदलू शकतो. कोलेस्ट्रॉलमध्ये वाढ झाली की, शरीराच्या खालच्या भागात रक्त नीट पोहोचत नाही. त्यामुळे ऑक्सिजनयुक्त रक्त पुरेशा प्रमाणात पोहोचू शकत नाही. परिणामी पायाचा रंग निळसर दिसू लागतो.

High cholesterol symptoms
Kidney Health: किडनीला निरोगी ठेवायचंय? 'या' सवयींचं करा पालन, राहा निरोगी

पायांचे तळवे थंड पडणं

हिवाळ्यात पाय थंड पडणं ही एक सामान्य गोष्ट आहे. मात्र जर तुमच्या पायाचे तळवे सतत थंड जाणवत असतील तर ते कोलेस्ट्रॉल वाढल्याचं लक्षण असू शकतं. जर तुम्हाला अशी समस्या जाणवत असेल तर तुम्ही ताबडतोब तुमच्या डॉक्टरांची भेट घ्यावी.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com