Kitchen Tips : फ्रिजमध्ये ठेवलेली कणिक काळी पडते? 'या' टिप्सने राहील दीर्घकाळ ताजी

Easy Hack For Fresh Dough : सकाळी डब्याला उशीर होऊ नये म्हणून तुम्ही रात्री कणीक मळून फ्रिजमध्ये ठेवता. मात्र सकाळी कणीक काळी पडलेली दिसते. कणीक काळी पडू नये म्हणून 'या' टिप्स फॉलो करा.
Easy Hack For Fresh Dough
Kitchen TipsSAAM TV
Published On

धावपळीच्या जीवनशैलीत आपण जेवण बनवताना अनेक शॉर्टकट घेतो. त्यातील एक म्हणजे सकाळी पोळ्या बनवायला घाई होऊ नये म्हणून अनेकजण रात्री कणीक मळून फ्रिजमध्ये ठेवतात. मात्र सकाळी फ्रिज उघडल्यावर आपण कणीक काळी पडलेली पाहतो. या कणीक पासून चपाती केल्यास आरोग्याला नुकसान होण्याचा धोका वाढतो. तसेच या कणीक पासून चपाती देखील चांगली होत नाही. कडक होते. अशावेळी वेळ, पैसा आणि मेहनत सर्व वाया जाते आणि सकाळी धावपळ होते. त्यामुळे फ्रिजमध्ये कणीक ठेवताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.

कणीक काळी पडू नये म्हणून 'अशी' घ्या काळजी

  • रात्री मळून आपण फ्रिजमध्ये सकाळसाठी कणीक ठेवतो. पण बऱ्याच वेळा सकाळी फ्रिज उघडल्यावर आपण कणीक काळी झालेली पाहतो. फ्रिजमध्ये ठेवलेली कणीक काळी पडू नये म्हणून तुम्ही कणकेला तेल लावून ठेवू शकता. यामुळे कणीक काळी पडणार नाही आणि दीर्घकाळ मऊ सुद्धा राहील.

  • कणीक काळी पडू नये म्हणून ती स्टोअर करताना त्याची विशेष काळजी घ्या. फ्रिजमध्ये कणीक ठेवताना ती हवाबंद डब्यामध्ये ठेवा आणि तो डबा थोडे पाणी भरलेल्या ताटामध्ये ठेवा. पाण्यामुळे कणीक ताजी राहण्यास मदत होते.

  • कणीक कधीच फ्रिजमध्ये उघडी ठेवू नये. यामुळे ती लवकर काळी पडते. फ्रिजमध्ये कणीक ठेवताना नेहमी हवाबंद डब्याचा वापर करावा. कणीक उघडी ठेवल्यास त्यावर फ्रिजचे पाणी पडण्याचा धोका असतो. तसेच उघडी कणीक लवकर कडक होते. त्यामुळे चपाती बनवणं कठीण जाते.

  • एअर टाईट कंटेनर मध्ये कणीक ठेवताना त्याला प्लास्टिक गुंडाळायला विसरू नका.

  • रात्री तुम्ही कणीक भिजवून ठेवत असाल तर पाण्याचा वापर कमी करा. कारण फ्रिजमधील ओलाव्यामुळे पीठ सैल होते आणि काळे पडते.

  • फ्रिजमध्ये ठेवलेले कणीक चपात्या बनवण्याच्या आधी सामान्य तापमानावर येऊ द्या. मगच पोळ्या करा. असे केल्यास पोळी मऊ होईल.

Easy Hack For Fresh Dough
Round Soft Chapati Tips : पीठ मळण्याच्या टेन्शन ला द्या सुट्टी, न लाटता काही मिनिटात बनेल गोल चपाती

आरोग्यासाठी काय चांगले?

खरंतर कणीक कधीच मळून फ्रिजमधून ठेवू नये. कारण ते आरोग्यासाठी चांगले नसते. नेहमी कणीक मळल्यावर त्वरित पोळ्या लाटाव्यात. पीठ मळून झाल्यावर ते १० मिनिट कपड्यामध्ये बांधून ठेवा यामुळे चपात्या छान होतील.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Easy Hack For Fresh Dough
Health Tips : रात्री फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेची सकाळी चपाती करताय? वेळीच व्हा सावध! नाहीतर...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com