Perfect Chapati Making Tips : सकाळी बनवलेली चपाती दुपारपर्यंत वातट होतेय? मग पीठ मळताना हा उपाय नक्की करा

Make Soft Perfect Chapati : अनेकदा महिला चांगल्या पद्धतीने कणीक तयार करतात. मात्र तरी देखील चपाती काही वेळाने वातट होते. चपाती जिकती मऊ असेल तितकीच ती खावीशी वाटते.
Make Soft Perfect Chapati
Perfect Chapati Making TipsSaam TV
Published On

रोजच्या जेवणात प्रत्येक घरात चपाती बनवली जाते. चपाती खाल्ल्याने पोट लगेच भरतं. चपाती बनवतात पीठ व्यवस्थित मळलेलं असणे गरजेचे आहे. कारण तुमची कणीक कशी आहे त्यावर चपाती कशी होणार हे ठरतं. अनेकदा महिला चांगल्या पद्धतीने कणीक तयार करतात. मात्र तरी देखील चपाती काही वेळाने वातट होते.

Make Soft Perfect Chapati
Ghee Chapati: तूप चपाती खाण्याचे आहेत आरोग्यदायी फायदे

चपाती जिकती मऊ असेल तितकीच ती खावीशी वाटते. जाड आणि वातट चपाती सुक्क्या भाजीसोबत खावी वातट नाही. आता चपाती बनवताना ती तव्यातून बाहेर काढल्यावर लगेच वातट होत असेल तर काय केले पाहिजे हेच या बातमीतून जाणून घेणार आहोत.

कोमट दूध

चापतीचे पीठ मळताना त्यात दूध ऍड करा. दूध तापवून कोमट करून घ्या. त्यानंतर पीठ मळत असताना त्यात पाणी आणि थोडे थोडे दूध मिक्स करा. दूध मिक्स केल्याने चपाती छान मऊ होते. कारण दुधामुळे पीठ मस्त फ्लफी होतं.

गुठळ्या फोडून घ्या

पीठ मळताना आपण त्यात पाणी किंवा दूध मिक्स करतो, त्यावेळी या पिठात फार गुठळ्या तयार होतात. गुठळ्या जास्त राहिल्यास कणीक चांगली मळली जात नाही. त्यासेच चपाती बनवल्यावर ती वातट होते. त्यामुळे पीठ मऊ मळलं गेलं पाहिजे.

तेलाचा वापर

कणीक मळताना पिठाचा छान गोळा तयार करून घ्या. पीठ मळताना त्यात कोमट पाण्याचा वापर करा. कणीक तयार होत असताना यामध्ये १ ते २ चमचे तेल मिक्स करा. पिठात तेल टाकल्याने सुद्धा तपाती वातट होत नाही.

तपाती लो फ्लेमवर भाजू नका

अनेक महिला चपाती करपूनये या भितीने गॅसची फ्लेम लो ठेवतात. लो फ्लेममुळे चपाती लवकर भाजली जात नाही. त्यामुळे चपाती जास्त कडक होते. शिवाय ती छान टम्म फुगत सुद्धा नाही.

या काही सिंपल टिप्स प्रत्येक महिलेने पाळल्या पाहिजेत. या टिप्सने तुम्ही बनवलेली चपाती सर्वांना आवडेल. चपाती अगदी ओठाने तोडावी इतकी मऊ होईल.

Make Soft Perfect Chapati
Perfect Chapati Tips: चपाती बनवताना पापडासारखी कडक होतेय ? या टिप्स फॉलो करा, बनेल एकदम नरम...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com