Perfect Chapati Tips: चपाती बनवताना पापडासारखी कडक होतेय ? या टिप्स फॉलो करा, बनेल एकदम नरम...

How To Make Perfect Roti : चपाती बनवायला खूप सोपी आहे, पण बनवताना जरासा निष्काळजीपणा तिला पापडासारखा कडक बनवू शकतो.
chapati
chapatiSaam TV
Published On

How To Make Soft Chapati : चपाती हा आपल्या आहारातील सगळ्यात महत्त्वपूर्ण घटक. पोटाची भूक भागवण्यासाठी चपाती ही बेस्ट मानली जाते. आपण बाहेर कितीही टेस्टी फूड खाल्ले तरी घरी बनवल्या पदार्थांची चव चाखल्याशिवाय पोट भरतच नाही.

चपाती हे ताटातील सगळ्यात महत्त्वाचे अन्न आहे. चपाती बनवायला खूप सोपी आहे, पण बनवताना जरासा निष्काळजीपणा तिला पापडासारखा कडक बनवू शकतो. यासाठी ती बनवताना अनेक गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते.

chapati
Besan Bhindi Recipe : कितीही चांगली बनवली तरी भेंडी चिकट होते ? मग याप्रकारे ट्राय करुन पाहा, बनेल टेस्टी

लोक बर्‍याचदा विचार करत राहतात की आणखी कोणती पद्धत आहे ज्यामुळे चपाती (chapati) अगदी मऊ बनेल. जर तुमची चपाती देखील पापडासारखी बनत असेल तर आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स (Tips) सांगणार आहोत ज्यामुळे तुमची चपाती अगदी मऊ बनेल जाणून घेऊया त्याबद्दल

1. कणीक कसे मळाल ?

कणीक मळताना लक्षात ठेवा की ते अगदी मऊ असले पाहीजे. जर तुम्ही पीठ घट्ट मळले असेल तर चपाती कडक होईल.

chapati
Best Food For Eyes : डोळ्यांनी धूसर दिसते ? चश्मा देखील लागलाय ? आहारात या पदार्थांचा समावेश जरुर करा

2. कणीक मळून ठेवा

कणीक मळून झाल्यानंतर काही वेळ (Time) तसेच झाकून ठेवा. त्यामुळे चपाती अगदी मऊसूत बनेल.

3. कणीक मळताना तेलाचा वापर करा

कणीक मळताना त्यात थोडेसे तेल टाका. भाजताना चपातीतील ओलावा कायम टिकून राहील.

chapati
Brain Foods For Children : मुलांची बुद्धी तल्लख व्हावी, अभ्यासात हुशार व्हावी असं वाटतं? ही ५ पदार्थ खाऊ घाला

4. हलक्या हातांचा वापर

चपाती बनवताना ती हलक्या हाताचा वापर करा. लाटताना अगदी हलक्या हाताने लाटा म्हणजे ती गोल फिरेलही व कडक होणार नाही.

5. सुक्या पिठाचा वापर कमी करा

अनेकजण चपाती बनवताना सुक्या पिठाचा जास्त वापर करतात, ज्यामुळे ती तव्याला चिकटत नाही व अधिक कडक बनते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com