सर्वात आघाडीची कार कंपनी Kia India ने त्यांच्या नवीन आकाराच्या फेसलिफ्ट सेल्टोस SUV च्या किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. भारतात Kia Seltos फेसलिफ्टची सुरुवातीची किंमत 10.89 लाख रुपये असून एक्स-शोरूममध्ये ठेवण्यात आली आहे.
सेल्टोस फेसलिफ्ट तीन ट्रिममध्ये उपलब्ध आहे. टेक लाइन, जीटी लाइन आणि एक्स-लाइन ज्या अनेक प्रकारांमध्ये येते. तसेच ही कार ह्युंदई क्रेटा, मारुती ग्रँड विटारा, फोक्सवॅगन टायगन या बड्या कारशी स्पर्धा करेल. अशातच नवीन सेल्टोस आणि त्याला टक्कर देणाऱ्या SUV च्या किंमतीत किती फरक आहे हे जाणून घेऊया
1. किमतीत (Price) फरक किती?
Kia Seltos आणि Hyundai Creta आता भारतातील एकमेव मध्यम आकाराच्या SUV आहेत ज्या पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांसह येतात. याशिवाय, मारुती सुझुकी ग्रँड विटाराला हायब्रिड पर्याय मिळतो. सेल्टोसच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, एक्स-शोरूम 10.89 लाख ते 19.99 लाख रुपये आहे.
Hyundai Creta ची किंमत रु. 10.87 लाख ते रु. 18.35 लाख, Maruti Suzuki Grand Vitara ची किंमत रु. 10.70 लाख ते 19.95 लाख रु. दरम्यान आहे. Skoda Kushaq ची किंमत 11.59 लाख ते 19.69 लाख रुपये आहे. तर Volkswagen Tiguan ची किंमत 11.62 लाख ते 19.46 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.
Honda ने अद्याप Elevate SUV च्या किमती जाहीर केल्या नाहीत. परंतु, साधारणत: तिची किंमत ही 11.49 लाख ते 17.99 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. असे म्हटले जात आहे.
2. 2023 kia Seltos इंजिन
नवीन 2023 Kia Seltos फेसलिफ्टमध्ये 1.5-लीटर एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळते जे 113 Bhp पॉवर जनरेट करते, जे 6-स्पीड MT आणि IVT गिअरबॉक्ससह जोडलेले आहे.
या व्यतिरिक्त, 1.5-लिटर डिझेल इंजिनची सुविधा देखील यात केली आहे जी 113 Bhp चे उत्पादन करते आणि iMT आणि AT सह येते. या व्यतिरिक्त, नवीन Kia Seltos ला 158 Bhp ची नवीन 1.5-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देखील मिळते, जी त्याच्या सेगमेंटमधील सर्वात दमदार SUV बनवते. हे iMT आणि 7-स्पीड DCT सह येते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.