Phonepe Income Tax Payment: फोन पे वर 'इन्कम टॅक्स पे' फीचर! सरकारी पोर्टलपासून होणार सुटका; Tax चुटकीसरशी भरता येणार, जाणून घ्या प्रोसेस

How To Pay Tax from Phonepe App: PhonePe ने भारतीय करदात्यांच्या गोष्टी सुलभ करण्यासाठी 'इन्कम टॅक्स पेमेंट' हे नवीन वैशिष्ट्य जोडले आहे.
PhonePe New Feature
PhonePe New FeatureSaam tv
Published On

Phonepe Income Tax Payment Feature: भारत सरकारने UPI सिस्टीम सुरू केल्यापासून भारतात ऑनलाईन व्यवहार वाढत आहेत. PhonePe अॅपला मोबाईल वॉलेट म्हणूनही ओळखले जाते. अशातच PhonePe ने भारतीय करदात्यांच्या गोष्टी सुलभ करण्यासाठी 'इन्कम टॅक्स पेमेंट' हे नवीन वैशिष्ट्य जोडले आहे.

याच्या मदतीने करदाते त्यांचा कर भरू शकतात. कर भरण्यासाठी आर्थिक वर्ष 2022-23 साठी ITR दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. यासाठी युजर्स क्रेडिट कार्ड किंवा UPI वापरू शकतात.

PhonePe New Feature
ITR Filling Process: आयटीआर फाइल करताना खर्च किती येतो? फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन कोणता? वेळेत न भरल्यास दंड आकारला जातो का?

भारतीय डिजिटल पेमेंट कंपनी PhonePe चे वैशिष्ट्य दोन्ही प्रकारच्या करदात्यांना म्हणजे वैयक्तिक आणि व्यवसायिकांना आगाऊ कर भरण्याची परवानगी देते. Paytm प्रमाणे, PhonePe अॅपला भारतात खूप पसंती दिली जाते.

1. स्वतंत्र लॉगिन आवश्यक नाही

यासाठी करदात्याला टॅक्स पोर्टलवर स्वतंत्रपणे लॉग इन (Log In) करण्याची गरज नाही. हे वैशिष्ट्य सादर करण्याचा उद्देश करदात्यांना चांगला अनुभव देणार आहे आहे. PhonePe कडून अशी माहिती देण्यात आली आहे. या वैशिष्ट्यासाठी PhonePe ने Paymate सोबत टायअप केले आहे. Paymate एक डिजिटल B2B पेमेंट आणि सेवा प्रदाता आहे.

PhonePe New Feature
Thane Picnic Spots: पिकनिक स्पॉट शोधताय? ते ही ठाण्यात; ही १० पर्यटनस्थळे आहेत उत्तम पर्याय...

2. क्रेडिट कार्ड किंवा UPI द्वारे पेमेंट

फोन पेवर सोमवारी जारी केलेल्या वैशिष्ट्यांच्या मदतीने करदाते क्रेडिट कार्ड किंवा यूपीआयच्या मदतीने कर भरू शकतात. क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यावर 45 दिवसांसाठी व्याजमुक्त रक्कम उपलब्ध असेल.

3. ITR फाइल शक्य नाही

PhonePe चे नवीन फीचर फक्त कर भरण्याची सुविधा देते, ते ITR फाइल करू शकत नाही. आयटीआर फाइलिंगसाठी करदात्यांना दुसरी प्रक्रिया फॉलो करावी लागेल.

PhonePe New Feature
ITR Refund : ITR फॉर्म भरल्यानंतर किती दिवसांनी रिफंड मिळतो ? जाणून घ्या प्रोसेस

4. PhonePe द्वारे आयकर कसा भरावा

• Android आणि iPhone वर उपलब्ध असलेले PhonePe अॅप उघडा.

• अॅपवर दिलेल्या 'इन्कम टॅक्स' या पर्यायावर क्लिक करा.

• त्याचा कर प्रकार, मूल्यांकन वर्ष आणि पॅन कार्ड तपशील निवडा.

• यानंतर एकूण कर रक्कम प्रविष्ट करा, नंतर पेमेंट मोड निवडा.

• एकदा पेमेंट केल्यावर, ते कामाच्या दोन दिवसात कर पोर्टलवर जमा केले जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com