ITR Filling Process: आयटीआर फाइल करताना खर्च किती येतो? फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन कोणता? वेळेत न भरल्यास दंड आकारला जातो का?

Last Date Of ITR Form Filling : ITR फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 31 जुलै 2023 आहे.
ITR Filling
ITR Filling Saam tv
Published On

ITR Refund Time : जर तुम्हीही अजून ITR फॉर्म भरला नसेल तर आजच भरा. ITR फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 31 जुलै 2023 आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची किंमत करदात्यांनी निवडलेल्या पद्धतीवर आणि सहाय्याच्या पातळीवर अवलंबून असते.

हा भरण्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग असतो ती सरकारी वेबसाइट. याद्वारे करदात्यांना त्यांचे टॅक्स रिटर्न मोफत भरता येणार आहे. जे खाजगी कर फायलिंग पोर्टलच्या सेवेला प्राधान्य देतात परंतु त्यांचे कर स्वतंत्रपणे भरू इच्छितात त्यांच्यासाठी शुल्क साधारणपणे रु. 200 ते रु. 250 पर्यंत असते. हा फॉर्म भरण्यासाठी अनेकदा इतर सहाय्यकाची निवड केली जाते.

ITR Filling
ITR Filling News : इन्कम टॅक्स रिटर्न भरताना ही चूक करू नका, अन्यथा १० लाखांचा दंड

1. फी किती आहे?

बिझनेस टुडेमध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, SAG इन्फोटेकचे व्यवस्थापकीय संचालक अमित गुप्ता यांनी सांगितले की, कर विशेष सेवेसह खाजगी पोर्टलद्वारे फाइल करण्यासाठी 750 ते 1000 रुपये खर्च येतो. परंतु जर तुम्हाला आर्थिकबाबीतून फायदा (Benefits) झाला असेल तर फॉलिंग चार्जेस 2,000-3000 रुपयांपर्यंत जाऊ शकतात. याची फी आपल्या परिस्थिती व आर्थिक गोष्टींवर अवलंबून असते.

2. योग्यरित्या ITR फॉर्म कसा भरायचा?

आयटीआर (ITR) योग्यरित्या भरणे महत्त्वाचे आहे. अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. DVS अॅडव्हायझर्सचे भागीदार सुंदर राजन टीके यांनी सांगितले की, 31 जुलैच्या देय तारखेनंतरही करनिर्धारक रिटर्न भरू शकतात. पण त्याचे काही तोटेही आहेत ज्याला सामोरे जावे लागेल. यासाठी दंडही भरावा लागू शकतो. जर करदात्याने अंतिम मुदतीपर्यंत आयकर रिटर्न भरला नाही तर मोठे नुकसान होऊ शकते.

ITR Filling
Weekly Rashibhavishya Marathi : अधिकमासात या राशींच्या प्रेमात येणार अडथळे, भाग्यात होतील मोठे बदल

3. उशीरा भरल्यास दंड

ज्या व्यक्तींचे एकूण उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना ITR उशीरा भरल्यास 5,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. एसएजी इन्फोटेकचे व्यवस्थापकीय संचालक अमित गुप्ता यांनी बिझनेस टुडेला सांगितले की, उशीरा आयटीआर फाइल करणाऱ्यांना 5000 रुपयांचा दंड आकारला जातो. फॉर्म उशीरा भरल्यामुळे दंड भरावा लागतो. याशिवाय दरमहा एक टक्का अतिरिक्त व्याज आकारले जाईल.

ITR Filling
Monsoon Honeymoon Travel Place : पावसाळ्यात कपलसाठी बेस्ट आहेत महाराष्ट्रातील 'ही' ठिकाणे !

4. माहिती खोटी असल्यावरही दंड

आयटीआर (Income Tax return) भरताना, कमी उत्पन्न घोषित करण्यासाठी 50 टक्के किंवा चुकीची उत्पन्न माहिती दिल्यास 200 टक्के दंड होऊ शकतो. हा एकूण कर बिलाच्या रकमेवर लावला जातो. डेलॉइट इंडियाचे भागीदार सुधाकर सेथुरामन म्हणाले की, कागदपत्रे असूनही कर विवरणपत्रे न भरल्यास थकबाकीच्या आधारावर केस होऊ शकते. तसेच तीन महिने ते सात वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com