Cyber Crime: ट्रेनमध्ये मोबाईल चार्जिंग करत असाल तर सावधान! बॅंक अकाऊंट होऊ शकतं रिकामं

Juice Jacking: सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्जिंग करताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.
Juice Jacking
Juice JackingSaam Tv
Published On

Juice Jacking On Public Charging Ports

स्मार्टफोन हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. कोणाशी संपर्क साधण्यासाठी, बॅंकेचे व्यवहार किंवा बहुतांश कामे करण्यासाठी आपल्याला मोबाईलची गरज ( Phone Public Charging Ports) पडते. अनेकदा आपण आपल्या मोबाईलची बॅटरी चार्ज करायला विसरतो. अशा वेळी अनेकदा आपण सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्जिंगला लावतो. आता सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्जिंग करताना आपल्याला विशेष काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा मोबाईल हॅक होऊ शकतो. (Latest Marathi News)

ज्यूस जॅकिंग या तंत्राद्वारे हॅकर्स सार्वजनिक ठिकाणी बसवलेल्या चार्जिंग बोर्डचा वापर करून सर्वसामान्यांची फसवणूक करतात. हे चार्जिंग बोर्ड रेल्वे, विमानतळ, बस किंवा बस स्टँड या ठिकाणी आपण (Cyber Crime) बघतो. खरं तर सार्वजनिक चार्जिंग बोर्डच्या माध्यमातून आपली फसवणूक होण्याची शक्यता आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ज्यूस जॅकिंग म्हणजे काय?

फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (FBI) ने अलीकडेच नागरिकांना एक चेतावणी दिली आहे. सार्वजनिक चार्जिंग बोर्ड धोकादायक ठरू शकतात, असं त्यांनी सांगितलं (Cyber Crime) आहे. लोकांनी स्वतःच्या पॉवर बँकांचा वापर करावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

ज्यूस जॅकिंग हा सायबर हल्ल्याचा एक प्रकार आहे. स्कॅमर बनावट चार्जिंग स्टेशन तयार करतात. सर्वसामान्यांची फसवणूक होईल, अशा पद्धतीने ही चार्जिंग स्टेशन्स तयार केली (Cyber Safety Tips) जातात. जेव्हा एखादा सामान्य माणूस आपला फोन या बनावट चार्जिंग स्टेशन्सने प्लग करतो, तेव्हा स्कॅमर वापरकर्त्यांच्या डिव्हाइसवर प्रवेश करू लागतात. यानंतर युजर्सच्या वैयक्तिक डेटा हॅक केला जातो. याशिवाय बँकिंगशी संबंधित माहिती चोरण्याचाही प्रयत्न केला जातो, त्यानंतर बँक खाते रिकामे होऊ शकते.

Juice Jacking
Cyber Fraud : 'हॅलो, पोलीस स्टेशनमधून बोलतोय...' तुम्हालाही असा कॉल आला तर सावध व्हा; या चूका करु नका

सार्वजनिक ठिकाणी काय काळजी घ्यायची?

ज्यूस जॅकिंग अतिशय गंभीर समस्या आहे. आपल्याला सहजतेने हा धोका ओळखता येत नाही. पण काही टिप्स फॉलो करून आपण काळजी घेऊ शकतो. रोखू शकता. सुरक्षिततेसाठी, तुमच्या फोनमध्ये USB डेटा ब्लॉकर वापरा. हे एक लहान अडॅप्टर आहे. हे चार्जिंग स्टेशन आणि फोन दरम्यान कार्य करते. त्यामुळं आपली वैयक्तक माहिती सुरक्षित राहु शकते. अन्यथा पॉवर बॅंकेचा वापर करावा.

Juice Jacking
QR Code आणि UPI च्या स्कॅमिंगला तुम्हीही बळी पडलात? Cyber Fraud ला सरकार कसा बसवणार आळा, वाचा एका क्लिकवर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com