पोळी आणि भाकरीशिवाय जेवणाचे ताट पूर्णच होत नाही. आपल्या जेवणाचा मुख्य भाग असलेली पोळी-भाकरी मऊसुत आणि लुसलुशीत असावी असे प्रत्येकाला वाटते. हिवाळा सुरु झाला की, अनेकजण तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि नाचणीची भाकरी खातात. हिवाळ्यात विशेषत: बाजरी आणि मक्यापासून बनवलेल्या भाकरी तयार करुन खाल्ल्या जातात.
बरेचदा भाकरी बनवताना त्या तुटतात किंवा कडक होतात. ज्यामुळे खाताना आपल्याला अनेकदा विचार करावा लागतो. आहारतज्ज्ञांच्या मते सतत गहू खाण्याऐवजी आपण आहारात तांदळाची (Rice) किंवा ज्वारीच्या भाकरीचा समावेश करायला हवा. भाकरी बनवताना त्याला चांगला पापुद्रा यायला हवा. भाकरी गार आणि मऊसूत राहायला हवी. यासाठी या टीप्स (Tips) फॉलो करा.
1. पीठ मळताना काळजी घ्या
भाकरी चांगली मळली जावी यासाठी पीठ चांगले मळून घ्या. त्यानंतर भाकरी सहज थापली किंवा लाटली जाते. ज्यामुळे भाकरीच्या कडा तुटण्याची शक्यताही कमी होते.
2. कोमट पाणी
भाकरी तुटू नये यासाठी पीठ कोमट पाण्यात (Water) मळा. ज्वारी, बाजरी आणि इतर भाकरीच्या पीठात ग्लुटेनचे प्रमाण कमी असल्याने पीठ कोरडे होते. कोमट पाण्याचा वापर केल्यास पीठ मळायला सोपे होते.
3. भाकरी लाटाताना काळजी घ्या
अनेकदा भाकरी थापणे हा एक टास्क असतो. भाकरी थापताना तळव्याने नाही तर बोटांनी भाकरी थापा. काही वेळेस भाकरी थापताना पीठ कमी पडल्याने किंवा जास्त जोर दिल्याने तुटते किंवा चिकटते. भाकरीचा गोळा घेऊन चपातीसारखे लाटू शकतात.
4. भाजताना लक्षात ठेवा
भाकरी भाजण्यासाठी तवा चांगला तापलेला असावा. भाकरीला खालच्या बाजूने पीठ असल्याने वरुन थोडा पाण्याचा हात फिरवल्यास पीठ राहात नाही. वरच्या बाजूने कोरडी दिसायला लागली की, मग दुसऱ्या बाजूने ती बारीक गॅसवर एकसारखी भाजावी. भाकरी मऊ सुत राहाते आणि टम्म फुगते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.