AI diet plan: वजन घटवण्यासाठी AI कडून डाएट प्लान घेणं योग्य? हा पर्याय आरोग्यासाठी फायदेशीर आहे जाणून घ्या

Artificial intelligence diet: वजन कमी करण्यासाठी एआयचा वापर किती सुरक्षित आहे? एआय डाएट प्लानचे फायदे, संभाव्य धोके, क्रॅश डाएटचा परिणाम आणि डॉक्टरांचा सल्ला का महत्त्वाचा आहे याबाबत माहिती जाणून घ्या.
artificial intelligence diet
artificial intelligence dietSAAM TV
Published On

AI हा शब्द आता आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती झाला असेल. कोणी या एआयच्या मदतीने स्वतःच्या कामात सुधारणा करतं, कोणी एआयच्या माध्यमातून नवीन माहिती जाणून घेतं, तर कोणी एआयच्या मदतीने स्वतःचा डाएट प्लान तयार करतं. आपल्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूमध्ये एआय पसरलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मात्र आरोग्याच्या बाबतीत एआयचा वापर करणं योग्य आहे का?

वजन कमी करण्यासाठी एआयचा सल्ला घेणं फायदेशीर आहे का, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. दरम्यान असं केल्याने त्याचे काही तोटे असू शकतात? हे योग्य आहे का ते जाणून घेऊया.

लोकं एआयची मदत का घेतात?

एआय टूल्स वजन कमी करण्याची प्रक्रिया खूप सोपी करतात. ते लगेच तुमच्यासाठी डाएट प्लान तयार करू शकतात, तुमच्या कॅलरीज मोजू शकतात आणि तुम्हाला एक्सरसाईज करण्याची आठवण करून देऊ शकतात. हे एका क्लिकवर २४-७ उपलब्ध असतं. हे तुम्हाला एका पर्सनल कोचप्रमाणे वाटू शकतं. मात्र सोयीस्कर असण्यासोबत त्याचे तोटे देखील आहेत.

काय तोटे होऊ शकतात?

जरी एआय खूप एडव्हान्स जरी असलं तरी ते डॉक्टर किंवा आहारातज्ज्ञ नाही. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी डॉक्टरऐवजी एआयवर अवलंबून राहणं धोकादायक ठरू शकतं.

artificial intelligence diet
Liver Disease: हातावरील बदल सांगतात लिव्हरची लक्षणे, डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा इशारा

विविध गरजा

प्रत्येक व्यक्तीची चयापचय क्रिया आणि वैद्यकीय इतिहास वेगवेगळे असतात. एआय बहुतेकदा उपलब्ध डेटावर आधारित तुम्हाला माहिती देतं. त्याला तुमच्या शरीराच्या छोट्या गरजा समजत नाहीत.

वैद्यकीय परिस्थितींकडे दुर्लक्ष करणं

जर तुम्हाला थायरॉईड, पीसीओडी, मधुमेह किंवा इतर कोणताही आजार असेल तर एआय योग्य पद्धतीने तुम्हाला डाएट प्लान देऊ शकत नाही. त्यामुळे असा प्लान फॉलो करणं धोकादायक ठरू शकतं. अयोग्य आहारामुळे पौष्टिक कमतरता किंवा हार्मोनल असंतुलन होऊ शकते.

artificial intelligence diet
Early signs of heart disease: शरीरात दिसणारे 'हे' ८ बदल वेळीच ओळखा; हृदयाच्या आजारांचा धोका दर्शवतात लक्षणं, दुर्लक्ष नकोच!

क्रॅश डाएट

कधीकधी वजन लवकर कमी करण्यासाठी एआय खूप कमी कॅलरीज असलेले आहार तुम्हाला घेण्यास सुचवतात. यामुळे केवळ तुम्हाला अशक्तपणाचा त्रासच नाही तर सतत कॅलरीज ट्रॅक करणं देखील कठीण होणं. अशा पद्धतीचं क्रॅश डाएट तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतं.

अचूक माहिती

अनेकदा एआयच्या डेटावर प्रश्न उपस्थित होताना दिसतं. ही माहिती अचूक असतेच असं नाही. त्यामुळे या माहितीवर विश्वास ठेवणं तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.

artificial intelligence diet
Liver signs on hands: हाताच्या तळव्यांतील हे बदल साधे नाहीत; लिव्हरच्या गंभीर समस्येची लक्षणं असू शकतात

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com