

लिव्हरच्या आजाराची लक्षणं हातांवर दिसतात.
लिव्हर बिघाडाची सुरुवातीची चिन्हं लगेचच जाणवत नाहीत.
डॉक्टरांचा लिव्हर रोगाबाबत इशारा जाणून घ्या.
आपल्या शरीरातील सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक म्हणजे लिव्हर आहे. रक्तातील विषारी घटक बाहेर काढणे, पचनक्रियेला मदत करणे, हार्मोन्स नियंत्रित ठेवणे अशा शेकडो कामांत लिव्हरचा सहभाग असतो. पण जेव्हा हा अवयव नीट कार्य करणे थांबवतो, तेव्हा शरीरात दिसणाऱ्या सूक्ष्म बदलांकडे अनेकदा आपण दुर्लक्ष करतो. डॉक्टरांच्या मते, लिव्हरचे बिघाडाचे काही सुरुवातीचे संकेत तुमच्या हातांवरच दिसू शकतात.
हातांची त्वचा, नखांचा रंग आणि बोटांची हालचाल ही शरीरातील अंतर्गत आरोग्याचं आरसा मानली जाते. Journal of Clinical and Experimental Hepatology मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, हातांवरील बदल जसे की हाताच्या तळव्यांवर लालसरपणा आणि नखं गोलसर आणि फुगलेली होणे हे दीर्घकालीन लिव्हर आजारांच्या प्रगतीशी संबंधित आहेत.
लाल तळवे
जर तुमच्या हातांच्या तळव्यांवर, विशेषतः अंगठा आणि करंगळीच्या खालील भागावर, असामान्य लालसरपणा दिसत असेल, तर तो लिव्हरच्या कार्यात बिघाडाचे लक्षण असू शकते. हे रक्तातील इस्ट्रोजेनचे प्रमाण वाढल्यामुळे घडते. दीर्घकाळ टिकणारा लालसरपणा, थकवा किंवा पिवळसर त्वचा यांसोबत असेल, तर त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे.
ड्युप्युट्रेन कॉन्ट्रॅक्चर
बोटं वाकडी होणे किंवा हात घट्ट होणे हे ड्युप्युट्रेन कॉन्ट्रॅक्चरचे लक्षण आहे. मद्यपान करणाऱ्या किंवा बऱ्याच दिवस लिव्हर रोगाने त्रस्त रुग्णांमध्ये हे जास्त दिसते.
टेरीचे नेल्स
नखं पांढरी आणि टोकाजवळ गुलाबी किंवा लालसर पट्टी असल्यास, ती Terry’s nails ची खूण आहे. हे लिव्हर सिरॉसिसमुळे रक्तप्रवाह आणि प्रोटीन पातळीत होणाऱ्या बदलामुळे घडते. नखं आणि बोटांच्या टोकांवर गोलसर फुगवटा दिसत असल्यास, ते Nail Clubbing चे लक्षण असू शकते.
हात थरथरणे
हात पुढे केल्यावर अचानक थरथरणे किंवा फडफडण्यासारखी हालचाल दिसल्यास, ते Asterixis असू शकते. हे Hepatic Encephalopathy या गंभीर लिव्हर विकाराचे प्रमुख लक्षण आहे. याचा अर्थ, लिव्हर रक्तातील विषारी घटक योग्य रीतीने फिल्टर करू शकत नाही, त्यामुळे मेंदूवर परिणाम होतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.