Diabetes Care: डायबिटीजच्या रुग्णांसाठी दिलासादायक बातमी! सिनॅपिक अ‍ॅसिडमुळे नैसर्गिकरीत्या भरतील जखमा, तज्ज्ञांनी शोधला रामबाण उपाय

Sinapic Acid: नागालँड विद्यापीठाच्या संशोधनात सिनॅपिक अ‍ॅसिड नावाचा नैसर्गिक घटक डायबिटीज रुग्णांच्या जखमा लवकर भरवतो, सूज कमी करतो आणि अंगविच्छेदनाच्या घटनांना आळा घालू शकतो.
Sinapic Acid
Diabetes Caresaam tv
Published On

जगभरात झपाट्याने वाढणाऱ्या आजारांपैकी मधुमेह म्हणजेच डायबिटीज हा एक प्रमुख आजार मानला जातो. ही केवळ रक्तातील साखरेची पातळी वाढवणारी समस्या नसून, ती शरीराच्या नैसर्गिक अनेक भांगावर देखील परिणाम करते. डायबिटीजच्या रुग्णांना अगदी छोटी जखम झाल्यास तो भरायला बराच वेळ लागतो. बऱ्याचदा जखम संक्रमित होऊन इतकी गंभीर अवस्था निर्माण होते की काही रुग्णांना पाय किंवा इतर अवयव कापावे लागतात. या गंभीर समस्येवर नागालँड विद्यापीठातील संशोधकांनी एक ‘सिनॅपिक अ‍ॅसिड’ (Sinapic Acid) नावाचा वनस्पतीजन्य नैसर्गिक घटक शोधला आहे. जो डायबिटीजच्या रुग्णांमध्ये जखम भरून येण्याची प्रक्रिया वेगवान करतो.

सिनॅपिक अ‍ॅसिड हे एक नैसर्गिक अँटिऑक्सिडंट संयुग आहे. जे विविध वनस्पती, धान्ये, फळे आणि भाज्यांमध्ये आढळते. अँटिऑक्सिडंट्स शरीरातील पेशींना नुकसान पोहोचवण्यापासून वाचवतात आणि सूज कमी करण्यास मदत करतात. संशोधनानुसार, जेव्हा मधुमेहग्रस्त रुग्णांना सिनॅपिक अ‍ॅसिड तोंडावाटे देण्यात आले, तेव्हा त्यांच्या जखमा नेहमीपेक्षा लवकर भरू लागल्या.

Sinapic Acid
Cholesterol Awareness: थकवा यतोय, हातपाय सुन्न पडतात; दुर्लक्ष करू नका अन्यथा होईल गंभीर आजार, वाचा तज्ज्ञांनी काय सांगितलं

शास्त्रज्ञांच्या मते, हा घटक शरीरातील SIRT1 नावाच्या जैविक मार्गाला (biological pathway) सक्रिय करतो. हा नवीन रक्तवाहिन्या तयार करण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. विशेष म्हणजे, या अभ्यासात कमी डोस म्हणजेच २० मिग्रॅ प्रति किलो वजनाच्या प्रमाणात दिलेले सिनॅपिक अ‍ॅसिड, उच्च डोस (४० मिग्रॅ प्रति किलो) पेक्षा जास्त प्रभावी ठरले. संशोधकांनी याला ‘इनव्हर्टेड डोस रिस्पॉन्स’ म्हटले आहे. म्हणजेच काही वेळा कमी प्रमाणात दिलेले औषध जास्त प्रभावी ठरते.

Sinapic Acid
Breathing Problems: रात्री झोपताना श्वास घ्यायला त्रास होतोय अन् वजनही वाढतंय? असू शकतो हार्ट अटॅकचा धोका, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

या संशोधनामुळे भविष्यातील औषधनिर्मितीसाठी नवीन दिशा मिळू शकते. नैसर्गिक संयुगांचा योग्य प्रमाणात वापर करून सुरक्षित आणि किफायतशीर औषधोपचार विकसित करता येऊ शकतात, असा संशोधकांचा विश्वास आहे. डायबिटीजच्या रुग्णांना बहुतेक वेळा फूट अल्सर म्हणजेच पायांवरील जखमा ही मोठी समस्या असते. या जखमा संक्रमित झाल्यास पाय कापावा लागण्याची वेळ येते. संशोधकांचे म्हणणे आहे की, जर सिनॅपिक अ‍ॅसिडवर आधारित नैसर्गिक oral therapy विकसित केला गेला, तर तो फक्त जखमा लवकर भरू देणार नाही, तर शरीराच्या इतर घटनांनाही मोठ्या प्रमाणात आळा घालू शकेल.

Q

सिनॅपिक अ‍ॅसिड म्हणजे काय?

A

सिनॅपिक अ‍ॅसिड हे एक नैसर्गिक अँटिऑक्सिडंट संयुग आहे. जे वनस्पती, धान्ये आणि फळांमध्ये आढळते. ते पेशींना नुकसानापासून वाचवते आणि सूज कमी करते.

Q

डायबिटीज रुग्णांसाठी हे कसे फायदेशीर आहे?

A

हे घटक जखमा लवकर भरवतो, सूज कमी करतो आणि नवीन रक्तवाहिन्या तयार करण्यात मदत करतो, त्यामुळे रुग्णांची बरे होण्याची प्रक्रिया वेगवान होते.

Q

हे संशोधन कुठे झाले?

A

हे संशोधन नागालँड विद्यापीठातील वैज्ञानिकांनी केले असून, त्यांनी सिनॅपिक अ‍ॅसिडचा वापर करून जखम भरवण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास केला.

Q

भविष्यात याचा उपयोग कसा होऊ शकतो?

A

या संशोधनामुळे नैसर्गिक घटकांवर आधारित औषधोपचार विकसित करून डायबिटीक फूट अल्सर सारख्या घटनांना आळा घालता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com