Sakshi Sunil Jadhav
अनेक महिलांना व पुरुषांनाही भुवया आणि पापण्यांचे केस पातळ होण्याची समस्या जाणवतात. सतत मेकअप, केमिकल प्रॉडक्ट्स, ताण आणि पोषणाची कमतरता यामुळे केस कमजोर होतात. यासाठी पुढील सिरम फायदेशीर ठरतील.
कॅस्टर ऑइल - १ चमचा, नारळ तेल १ चमचा,व्हिटॅमिन ई कॅप्सूल १, अॅलोव्हेरा जेल अर्धा चमचा इ.
सर्व साहित्य एका छोट्या बॉटलमध्ये घ्या आणि चांगले हलवा. सीरम गुळगुळीत झाल्यावर झाकण लावून ठेवावे.
रात्री झोपण्यापूर्वी भुवया व पापण्यांवर कापसाच्या स्टिकने हलक्या हाताने सीरम लावा.
दररोज रात्री हे सीरम लावल्यास ३० दिवसांत फरक जाणवेल. याने कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही.
कॅस्टर ऑइल केसांची मुळे मजबूत होतात. नारळ तेल ओलावा टिकवतं, व्हिटॅमिन ई केसांना चमकदार बनवतं तर अॅलोव्हेरा केस गळतीच्या समस्या दूर करतं.
सीरम डोळ्यात जाऊ देऊ नका. तसेच अॅलर्जीक त्वचा असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
भुवया-पापण्यांवर मेकअप रिमूव्हर किंवा वॉटरप्रूफ मस्करा वारंवार वापरणं टाळा.
ही माहिती घरगुती उपाय व नैसर्गिक घटकांवर आधारित आहे. कोणतीही अॅलर्जी किंवा त्वचेची समस्या असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.