Sakshi Sunil Jadhav
दिवाळी सुट्टीत अनेकजण पिकनिक किंवा छोट्या सहलीचा प्लॅन आखत आहेत. अशातच मुंबई आणि पुण्याच्या जवळ असलेले एक पर्यटनस्थळ पुन्हा चर्चेत आले आहे.
‘मिनी गोवा’ म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण म्हणजे अलिबाग. येथील अथांग समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले आणि वॉटर स्पोर्ट्समुळे हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक ठरले आहे.
अलिबाग हे दोन्ही शहरांपासून सुमारे 100 ते 120 किमी अंतरावर आहे, त्यामुळे एक दिवसाच्या सहलीसाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.
मुरुड-जंजिरा किल्ला हा समुद्राच्या मध्यभागी असलेला जगप्रसिद्ध किल्ला पर्यटकांच्या यादीत नेहमीच असतो. तसेच तुम्ही खंदेरी-उंदेरी आणि कुलाबा किल्ल्यांनाही भेट देऊ शकता.
तुम्ही काशीद, नागाव, मांडवा आणि किहिमजवळच्या प्रसिद्ध बिचवर वेळ घालवू शकता. ईथे तुम्हाला शांतता आणि सौंदर्य दोन्ही अनुभवायला मिळेल.
तुम्ही येथे किनाऱ्यांवर जेट स्की, पॅरासेलिंग, बोट राईड आणि बनाना राईड सारखे रोमांचक खेळ खेळू शकता.
येथील वातावरण, बीच व्हाईब्स आणि सुंदर रिसॉर्ट्समुळे अलिबागला मिनी गोवा म्हटले जाते.
मुंबईहून मांडवा पर्यंत फेरी सेवा सुरू असल्याने प्रवास अधिक सोपा आणि वेगवान झाला आहे.