Samudra Shastra: महिलांचा डावा डोळा फडफडणं शुभ की अशुभ? सामुद्रिक शास्त्रात सांगितलंय रहस्य

Left eye twitching female: आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाच्या हालचालीमागे काही ना काही अर्थ असतो. ज्योतिषशास्त्र आणि सामुद्रिक शास्त्रानुसार (Samudrik Shastra), शरीरातील अवयवांचे फडफडणे हे भविष्यातील काही घटनांचे संकेत देतात.
Left eye twitching female
Left eye twitching femalesaam tv
Published On
Summary
  • स्त्रियांचा डावा डोळा फडफडणे शुभ मानले जाते.

  • हे सौभाग्य, आर्थिक लाभाचे संकेत असते.

  • नोकरीत पदोन्नतीची शक्यता वाढते.

आपल्या शरीरातील अवयवांची विशिष्ट हालचाल होणं ही सर्वसामान्य गोष्ट आहे. अनेकदा हे थकवा, ताणतणाव किंवा इतर कारणांमुळे घडते. पण समुद्रशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने ही घटना सामान्य मानली जात नाही. प्राचीन मान्यतेनुसार, डोळा किंवा इतर अवयव फडफडणं हे येणाऱ्या काळातील काही संकेत देत असते.

स्त्रियांच्या बाबतीत, डावा डोळा फडफडणं हे अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. असं झाल्यास आयुष्यात चांगल्या घडामोडी होण्याची शक्यता वाढते. चला तर मग जाणून घेऊया स्त्रियांच्या डाव्या डोळ्याच्या फडफडण्यामागील रहस्य काय आहे.

Left eye twitching female
Vastu Shastra: ऑफिस टेबलावर 'या' वस्तू ठेवणं आर्थिक नुकसानाचं कारण ठरू शकतं

डावा डोळा फडफडणं - सौभाग्याचं चिन्ह

मान्यतेनुसार स्त्रियांच्या डाव्या डोळ्याचं फडफडणं हे सौभाग्याचं लक्षण आहे. असं घडल्यास जवळच्या भविष्यात एखादा शुभ समाचार मिळू शकतो. कधी कधी हे आर्थिक लाभाचेही संकेत मानले जातात. अचानक मिळालेल्या यशामुळे जीवनात मोठी प्रगती होऊ शकते.

Left eye twitching female
Vastu Shastra Tips : या ५ ठिकाणी जेवायला बसताय का? आताच सवय बदला, अन्यथा व्हाल कंगाल

नोकरी व व्यवसायात प्रगती

डावा डोळा फडफडल्याने स्त्रियांना केवळ नोकरीतच नव्हे, तर व्यवसायातही यश मिळण्याची शक्यता असते. मान्यतेनुसार पदोन्नती, जबाबदाऱ्या वाढणे किंवा व्यवसायात नफा मिळणं असे लाभ होतात.

Left eye twitching female
Vastu Shastra: घरात कोणत्या रंगाचे शिवलिंग ठेवणे शुभ? वाचा आध्यात्मिक कारण

कौटुंबिक आनंदाचे संकेत

डोळा फडफडल्याने केवळ आर्थिक किंवा व्यावसायिक लाभच नव्हे, तर कौटुंबिक आनंदही मिळू शकतो. विवाह ठरणं, अपत्यप्राप्ती होणं यांसारख्या शुभ प्रसंगांची शक्यता वाढते.

Left eye twitching female
Vastu Tips: पितृपक्षामध्ये वास्तू शास्त्राच्या 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका; पितर नाराज होण्याची शक्यता

समाजात मान-सन्मान वाढणे

स्त्रियांच्या डाव्या डोळ्याचं फडफडणं हे सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याचंही संकते असतात. अडथळे दूर होऊन अडकलेली कामं पूर्ण होऊ शकतात. परिणामी समाजात आदर आणि मान्यता वाढते.

Left eye twitching female
Vastu Tips For Bedroom: तुमच्या नात्याच्या बर्बादीचं कारण बनू शकतात बेडरूममधील 'या' गोष्टी; तुम्हीही करत असाल चूक तर सावध व्हा!
Q

स्त्रियांच्या डाव्या डोळ्याचे फडफडणे कोणते संकेत देते?

A

हे सौभाग्य, आर्थिक लाभ आणि यशाचे संकेत देते.

Q

डावा डोळा फडफडल्याने नोकरीत काय फायदा होतो?

A

नोकरीत पदोन्नती आणि जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता असते.

Q

कौटुंबिक आनंदाचे कोणते संकेत दिसतात?

A

विवाह, अपत्यप्राप्तीसारख्या शुभ घटनांची शक्यता वाढते.

Q

स्त्रियांच्या डाव्या डोळ्याचे फडफडणे का शुभ मानले जाते?

A

भविष्यातील चांगल्या घटनांचे संकेत असल्यामुळे शुभ मानले जाते.

Q

समाजात मान-सन्मान वाढण्याशी हे कसे निगडित आहे?

A

अडकलेली कामे पूर्ण होऊन समाजात मान्यता मिळते.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com