Dhanshri Shintre
ऑफिसमध्ये काम करणारे अनेकजण आपला डेस्क आकर्षक आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी नेहमीच काही ना काही सजावट करत असतात.
मात्र, काही वस्तू अशा आहेत ज्या तुमच्या ऑफिस डेस्कवर ठेवणे टाळले पाहिजे कारण त्यांचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
ऑफिस डेस्कवर तुळशीचे रोप ठेवू नये, कारण त्याची पूजा केली जाते आणि त्याला अशुद्ध स्पर्श निषिद्ध मानला जातो.
ऑफिस टेबलावर जुनी पुस्तके-कागदपत्रे न ठेवल्यास चांगले, यामुळे मानसिक स्पष्टता आणि निर्णयक्षमता अधिक प्रभावी राहते.
तुटलेल्या वस्तू ऑफिस टेबलावर ठेवू नयेत, यामुळे नकारात्मक ऊर्जा पसरते आणि कामात अडथळे निर्माण होतात.
कृत्रिम फुले ऑफिस डेस्कवर ठेवू नयेत, कारण यामुळे करिअरच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते.