Sakshi Sunil Jadhav
वास्तु शास्त्राचे पैशांवर आधारित काही महत्वाचे नियम आहेत.
वास्तुशास्त्रानुसार काही ठिकाणी बसून जेवणे अत्यंत वाईट आणि आर्थिक दृष्ट्याही चुकीचे मानले जाते.
वास्तु शास्त्रानुसार घरात जेवताना पुढील 5 जागांवर बसून जेवणे टाळले पाहिजे.
तुम्ही जर घरात चुकीच्या ठिकाणी बसून जेवलात तर तुम्हाला सतत पैशाची, धनधान्याची चणचण जाणवेल.
दाराजवळ बसून जेवल्याने लक्ष्मीचा अपमान होतो. त्यांचे आर्थिक नुकसान होते.
देवघराजवळ बसून जेवल्याने घरातली सुख-शांती नष्ट होते.
सोफ्यावर बसून जेवल्याने तुम्हाला आर्थिक नुकसान आणि मानसिक तणावांना सामोरं जावं लागू शकतं.
घरामध्ये पसाऱ्यात किंवा अस्वच्छ ठिकाणी बसून जेवल्याने पैसा हातात टिकत नाही.
गॅसच्या समोर जेवल्याने घरातली शांती भंग होते आणि वाद होतात.