Sakshi Sunil Jadhav
रव्यापासून तुम्ही नाश्त्यासाठी अनेक पदार्थ तयार करू शकता. पुढे आपण रव्याचा केक बनवण्याची रेसिपी पाहणार आहोत.
दूध, रवा, दही, तेल, साखर, मीठ, बेकींग सोडा, बेकींग पावडर, वेलची पावडर इ.
सर्वप्रथम एका भांड्यात बारिक रवा भिजत घाला.
दही आणि तेलाच्या मिश्रणात साखर विरघळवा. मग त्यात दूध मिक्स करा.
रव्यात मीठ आणि तयार दह्याचे मिश्रण घाला. १० मिनिटे हे मिश्रण झाकून ठेवा.
पिठात आता इतर साहित्य घाला. एका भांड्याला तेलाने ग्रीस करून बेकिंग ट्रेमध्ये ठेवा.
केक मंद आचेवर ४५ मिनिटे बेक करा.
टूथपिक घालून ते झाले आहे का ते तपासा. केक बाहेर काढून फ्रीजमध्ये थंड करा.
लहान मुलांसोबत मऊ सॉफ्ट केकचा आस्वाद घ्या.