Instagram देणार YouTube ला ठक्कर! आता Instaवर येतंय शानदार फीचर, व्हिडिओ क्रिएटर्स होतील मालामाल

Instagram’s New Video Feature : इन्स्टाग्रामवर आता ९० मिनिटांपर्यंतचे व्हिडिओ अपलोड करण्याच्या नव्या फीचरची चाचणी सुरू आहे. युट्यूबला टक्कर देणारे हे फीचर काय आहे हे जाणून घ्या.
Instagram tests horizontal videos up to 90 minutes long
Instagram tests horizontal videos up to 90 minutes longsaam tv
Published On: 
Summary
  • इन्स्टाग्राम ‘Features’ नावाच्या नवीन व्हिडिओ फॉरमॅटची चाचणी

  • निवडक क्रिएटर्सना ९० मिनिटांपर्यंतचे आडवे व्हिडिओ अपलोड करता येणार

  • पॉडकास्ट, मुलाखती आणि विनोदी कार्यक्रमांसारखा दीर्घ कंटेंट इन्स्टाग्रामवर पाहता येणार

इन्स्टाग्राम आता फक्त छोटे 'रील्स' पाहण्याचं फ्लॅटफॉर्म राहणार नाही. मेटा आता मोठे व्हिडिओं आपल्या साईटवर आणणार आहे. त्यासाठी एका नवीन फिचरची चाचणी घेत आहे. जर हे फिचर सर्व युझर्ससाठी उपलब्ध झाले, तर पॉडकास्ट, मुलाखती, विनोदी कार्यक्रम किंवा इतर दीर्घ स्वरूपातील आशय पाहण्यासाठी युझर्सला दुसऱ्या ॲप्सवर जाण्याची गरज उरणार नाहीये.

इन्स्टाग्रामवर आपण छोटे रिल्स पाहतो, परंतु आता कंपनी मोठे व्हिडिओ देखील आपल्या साईटवर आणणार आहे. यासाठी नवीन फीचर आणलं जाणार असून याच्या माध्यमातून युझर्स हे ९० मिनिटांपर्यंतचा व्हिडिओ अपलोड करू शकतात. याचा फायदा जे युझर्स कंटेंट क्रिएटर्स मोठे व्हिडिओ बनवतात. आधी यांना मोठे व्हिडिओ युट्यूबवर पोस्ट करावा लागत होता.

रिलच्या क्लीपमधून पाहू शकणार पूर्ण पॉडकास्ट

जर एखाद्या सोशल मीडिया युझरला इन्स्टाग्रामवर एखाद्या पॉडकास्टमधील एक क्लीप आवडली असेल तर या नव्या फीचरमुळे तो युझर तो पूर्ण पॉडकास्ट येथे पाहू शकतो. यासाठी युझर्सला YouTube किंवा इतर कोणत्याही ॲपवर जाण्याची गरज पडणार नाहीये. कंपनी 'एक्सप्लोर' (Explore) विभागात आणि ॲपच्या इतर भागांमध्येही मोठे व्हिडिओ दाखवणार आहे.

अमेरिकेतील काही निवडक क्रिएटर्ससोबत टेस्टिंग

हे फिचर अमेरिकेतील काही निवडक निर्मात्यांच्या गटासोबत तपासले जात आहे. याआधी इंस्टाग्रामने ब्राझीलमध्येही याची टेस्टिंग घेतली होती. या चाचणीमध्ये पॉडकास्ट होस्ट एम्मा ग्रेडे, सौंदर्य आणि फॅशन क्षेत्रातील निर्माती मोनेट मॅकमायकेल, मुलाखतकार प्रेस्टन राकोव्स्की आणि फुटबॉलविषयक आशय तयार करणारे डोनाल्ड डी ला हे यांसारख्या क्रिएटर्सचा समावेश आहे.

इन्स्टाग्रामचे प्रमुख ॲडम मोसेरी यांनीही दीर्घ-स्वरूपातील व्हिडिओंबाबत आपली भूमिका बदलली आहे. त्यांनी कबूल केले की, याआधी ते प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारच्या व्हिडिओंना स्थान देण्याच्या बाजूने नव्हते. मात्र आता कंपनी या दिशेने काम करत असून, इन्स्टाग्राममध्ये दीर्घ-स्वरूपातील कंटेंट करण्याची तयारी करत आहे.

Instagram tests horizontal videos up to 90 minutes long
रात्री ११ वाजता इन्स्टाग्रामवर आला एक 'व्हिडिओ कॉल' अन् मुंबईतील व्यावसायिकाच्या आयुष्यात वादळ; नक्की काय घडलं?

टीव्हीवरही इन्स्टाग्राम व्हिडिओ पाहू शकाल

इन्स्टाग्रामला मोठे व्हिडिओ केवळ मोबाइल स्क्रीनपुरते मर्यादित ठेवायचे नाहीये तर कंपनी युझर्सला त्यांचे इन्स्टाग्राम व्हिडिओ टीव्हीवरही पाहण्याची सुविधा देण्याचा प्लॅन आखत आहे. अमेरिकेत 'इन्स्टाग्राम टीव्ही' (Instagram TV) ॲप आधीच सॅमसंग टीव्ही (Samsung TV), ॲमेझॉन फायर टीव्ही (Amazon Fire TV) आणि गुगल टीव्ही (Google TV) वर उपलब्ध आहे. यासह कंपनी ॲपल टीव्ही (Apple TV) साठीही सपोर्ट आणण्याची तयारी करत आहे.

Instagram tests horizontal videos up to 90 minutes long
इंस्टाग्राम रिल्सवर ट्रेंडमध्ये असणाऱ्या ‘OOTD’ या शब्दाचा नेमका अर्थ काय? तुम्हाला माहितीये का?

फोनद्वारे टीव्हीवरील व्हिडिओ होतील कंट्रोल

कंपनी अशा वैशिष्ट्यांवरही काम करत आहे, ज्याद्वारे युझर्स आपल्या फोनचा वापर करून टीव्हीवर चालणारे इंस्टाग्राम व्हिडिओ नियंत्रित करू शकतील. यासह त्यांचे मित्र कोणते व्हिडिओ पाहत आहेत, हे देखील युझर्सला पाहता येईल. तसेच व्हिडिओ फोनवर सेव्ह करून नंतर टीव्हीवर पाहण्याचा पर्यायही उपलब्ध होऊ शकतो.

क्रिएटर्सला होईल फायदा

इन्स्टाग्राम दीर्घ स्वरूपाच्या (long-form) व्हिडिओंच्या माध्यमातून क्रिएटर्ससाठी उत्पन्नाचे नवीन मार्गही शोधत आहे. कंपनी अशा क्रिएटर्सला पाठिंबा देण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे, जे आपल्या व्हिडिओमध्ये ब्रँड्सचा प्रचार करू इच्छितात. याद्वारे त्यांना ब्रँड्ससोबत काम करण्याची आणि उत्पन्न मिळवण्याची संधी मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com