Manasvi Choudhary
सोशल मिडिया इन्स्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूबच्या रिल्सवर तुम्ही अनेकदा OOTD हा शब्द पाहिला असेल.
सेलिब्रिटीपासून ते अनेक इनफ्ल्यूएन्सर त्यांच्या व्हिडीओमध्ये OOTD या शब्दाचा वापर करतात. पण तुम्हाला या शब्दाचा अर्थ माहित आहे का?
OOTD हा शब्द का लिहतात? त्याचा अर्थ काय? हे या वेबस्टोरीतून सोप्या भाषेत जाणून घेऊया.
'OOTD'म्हणजे 'Outfit Of The Day' असा होतो. ज्याचा अर्थ "आजचा माझा पोशाख" किंवा "आजच्या दिवसाचा पेहराव" असा होतो.
जेव्हा एखादी व्यक्ती किंवा फॅशन क्रिएटर एखाद्या विशेष दिवशी, सणाला, पार्टीला किंवा अगदी ऑफिसला जाताना छान कपडे परिधान करते, तेव्हा त्या संपूर्ण आऊटफिटचा फोटो किंवा रील काढून तो सोशल मीडियावर शेअर केला जातो.
पोस्टच्या कॅप्शनमध्ये #OOTD असे लिहून फॅशन ट्रेंड फॉलो केला आहे, हे आपल्या फॉलोअर्सना सांगतात.