रात्री ११ वाजता इन्स्टाग्रामवर आला एक 'व्हिडिओ कॉल' अन् मुंबईतील व्यावसायिकाच्या आयुष्यात वादळ; नक्की काय घडलं?

Instagram video call blackmail case : गिरगावातील एका व्यावसायिकाला इन्स्टाग्रामवरील मैत्रीनंतर रात्री व्हिडिओ कॉलद्वारे ब्लॅकमेल करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.
Crime
CrimeSaam tv
Published On: 

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Instagram blackmail scam : इन्स्टाग्रामवर एका अनोळखी महिलेशी झालेली मैत्री गिरगावातील एका व्यावसायिकाला भलतीच महागात पडली आहे. आधी मैत्री, त्यानंतर व्हिडिओ कॉल आणि काही दिवसांतच थेट साडेतीन लाख रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आल्याने, या व्यावसायिकाने अखेर पोलिसांत धाव घेतली आहे.

नेमके काय घडले?

तक्रारदाराला इन्स्टाग्रामवर एका महिलेच्या अकाउंटवरून ‘Hi’ असा मेसेज आला होता. त्यानंतर दोघांमध्ये संभाषण सुरू झाले. सुमारे दोन महिन्यांनंतर या महिलेने तक्रारदाराला दुसऱ्या एका इन्स्टाग्राम अकाउंटवरून एका महिलेशी बोलण्याचा आग्रह केला.

सुरुवातीला तक्रारदाराने याला नकार दिला, मात्र वारंवार आग्रह केल्यानंतर त्याने त्या अकाउंटशी संपर्क साधला. त्यानंतर एका रात्री ११ वाजेच्या सुमारास ‘kanxi_maya’ या युझरनेम असलेल्या अकाउंटवरून त्याला व्हिडिओ कॉल आला.

Crime
IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओ कॉलवर आलेली महिला नग्न अवस्थेत होती आणि तिने तक्रारदारालाही कपडे काढण्यास सांगितले. त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तक्रारदाराने तिचे ऐकले. अवघ्या दोन मिनिटांचा हा व्हिडिओ कॉल समोरील व्यक्तीने स्क्रीन रेकॉर्डिंगद्वारे रेकॉर्ड केला.

साडेतीन लाखांची खंडणी

यानंतर २ जून रोजी तक्रारदाराला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्याने "तुमचा अश्लील व्हिडिओ माझ्याकडे आहे," असे सांगत साडेतीन लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली.

Crime
सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

त्यानंतर मेसेजद्वारेही वारंवार पैशांची मागणी करत धमक्या दिल्या जाऊ लागल्या. सुरुवातीला भीतीपोटी तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार केली नाही; मात्र धमक्यांचे सत्र थांबत नसल्याने अखेर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

इन्स्टाग्रामवरील मैत्रीचा गैरफायदा घेऊन व्हिडिओ कॉलद्वारे सापळा रचत ब्लॅकमेलिंग करण्यात आल्याचा संशय असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com