Independence Day 2024 : यंदा १५ ऑगस्ट होईल स्वादिष्ट; नाश्त्याला बनवा 'तिरंगा ढोकळा', नोट करा सिंपल रेसिपी

Tiranga Dhokla Recipe : स्वातंत्र्य दिनाची सुरुवात खास करा. 15 ऑगस्टची सकाळ खमंग आणि स्वादिष्ट बनवण्यासाठी नाश्त्याला तिरंगा ढोकळा बनवा. सिंपल रेसिपी आताच नोट करा.
Tiranga Dhokla Recipe
Independence Day SpecialSAAM TV
Published On

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्यामुळे आजचा दिवस 'स्वातंत्र्य दिन' म्हणून साजरा केला जातो. आज संपूर्ण भारतभर ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. अशात दिवसाची सुरुवात प्रसन्न होण्यासाठी सकाळच्या नाश्त्याला झटपट स्वातंत्र्यदिनानिमित्त स्पेशल तिरंगा ढोकळा बनवा. आपल्या कुटुंबासोबत याचा आस्वाद घ्या.

१५ ऑगस्ट ला सकाळच्या नाश्त्याला तिरंगा ढोकळा बनवण्याची रेसिपी जाणून घ्या.

तिरंगा ढोकळा

साहित्य

  • रवा

  • दही

  • आलं पेस्ट

  • तेल

  • मीठ

  • इनो

  • पाणी

  • पालक प्युरी

  • खाद्य केशरी रंग

  • हिरव्या मिरची

  • लाल मिरची पावडर

  • कढीपत्ता

  • साखर

  • लिंबाचा रस

  • केशरी गाजर

कृती

तिरंगी ढोकळा तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये रवा, दही, मीठ, आलं पेस्ट, पाणी एकत्र करून छान पेस्ट करून घ्या. आता आपल्याला या मिश्रणापासून दोन रंगाचे ढोकळ्याचे बॅटर तयार करायचे आहे. त्यासाठी हे सारण सम प्रमाणात दोन बाऊलमध्ये काढून घ्या. पहिल्या बाऊलमध्ये पालक प्युरी, कोथिंबीर आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची पेस्ट घालून सर्व मिश्रण एकत्र करून घ्या. अशाप्रकारे तिरंग्याचा हिरवा रंग तयार झाला. केशरी रंग तयार करण्यासाठी केशरी रंग, लाल मिरची पावडर आणि केशरी गाजरांची पेस्ट मिक्स करा. अशाप्रकारे तिरंग्याचा केशरी रंग तयार झाला.

Tiranga Dhokla Recipe
Independence Day 2024: स्वातंत्र्य दिनानिमित्त स्पेशल बेत, बनवा 'तिरंगा बर्फी' अन् वाढवा गोडवा

आपण कुकरच्या सहाय्याने ढोकळ्याला स्टीम करणार आहोत. त्यामुळे कुकरच्या तीन भांड्यात एका एका रंगाचे मिश्रण भरून शिजवायला ठेवा. २-३ शिटी झाली की कुकर थंडकरून ढोकळा नीट शिजला का ते तपासून घ्या. यासाठी तुम्ही सुरीचा वापर करू शकता. उकडलेल्या मिश्रणात सुरी अलगद घालून बाहेर काढा. जर सुरीला पीठ लागले नाही तर, समजा ढोकळा उत्तम शिजला आहे आणि जर सुरी चिकट झाली तर कुकरला अजून एक शिट्टी काढून घ्या. आता शिजवलेले ढोकळ्याचे तिन्ही भाग एकावर एक ठेवून छान आयताकृती कापून घ्या.

ढोकळ्याला फोडणी देण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून मस्त परतून घ्या. पुढे या मिश्रणात मीठ, साखर आणि लिंबाचा रस घालून चांगले एकजीव करा. यात थोडे पाणी घालून एक उकळी काढून गॅस बंद करा. ही बनवलेली फोडणी ढोकळ्यावर घाला. तुमचा खमंग तिरंगा ढोकळा तयार झाला.

Tiranga Dhokla Recipe
Independence Day Special Recipe : स्वातंत्र्य दिन साजरा करताना घरच्याघरी बनवा तिरंगा पुलाव; वाचा सिंपल आणि झटपट तयार होणारी रेसिपी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com