suger
suger

Microplastics : भारतातील सर्व ब्रँडचे मीठ आणि साखरेत प्लॉस्टिक, संशोधनातून धक्कादायक खुलासा

Salt and Sugar : तुम्ही खात असलेल्या मीठ आणि साखरेत प्लॉस्टिक असल्याचं एका संशोधनातून समोर आले आहे. 'टॉक्सिक्स लिंक' या पर्यावरण संशोधन संस्थेच्या अभ्यासातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
Published on

Microplastics in Salt and Sugar : तुम्ही खात असलेल्या मीठ आणि साखर यावर करण्यात आलेल्या एका संशोधनात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मीठ आणि साखरेत प्लॉस्टिक असल्याचे एका संशोधनात समोर आले आहे. 'टॉक्सिक्स लिंक' या पर्यावरण संशोधन संस्थेनं याबाबत रिसर्च केला होता. मीठ आणि साखरेत मायक्रोप्लॉस्टिक असल्याचं त्यांच्या संशोधनात समोर आले आहे.

भारतीय बाजारात विकल्या जाणाऱ्या मीठ आणि साखरेच्या सर्व प्रकारच्या ब्रँडमध्ये मायक्रोप्लास्टिकचे कण सापडले आहेत. 'टॉक्सिक्स लिंक'च्या संशोधनात ही धक्कादायक गोष्ट समोर आली. मंगळवारी याबाबतचा अहवाल प्रसिद् झाला. 'मिठ आणि साखरेतील मायक्रोप्लास्टिक्स' या नावाने 'टॉक्सिक्स लिंक'ने रिसर्च केला. त्यासाठी त्यांनी टेबल मीठ, रॉक मीठ, समुद्री मीठ आणि स्थानिक कच्चे मीठ यासह 10 प्रकारच्या मीठावर रिसर्च केला. तसेच ऑनलाइन आणि स्थानिक बाजारातून खरेदी केलेल्या पाच प्रकारच्या साखरेचीही तपासणी केली.

suger
Diabetes Diet : रक्तातील साखर नियंत्रित ठेवायची आहे? आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा

'टॉक्सिक्स लिंक' या संस्थेला संशोधनात सर्व ब्रँडच्या मीठ आणि साखरेत मायक्रोप्लास्टिक असल्याचं निदर्शनास आले. या मायक्रोप्लास्टिकचा आकार 0.1 मिलीमीटर (मिमी) ते 5 मिमी पर्यंत असल्याचे निदर्शनास आले. जे फायबर, पेलेट्स, फिल्म्स आणि तुकड्यांसह विविध स्वरूपात उपस्थित होते. रिसर्चमध्ये बहुरंगी पातळ तंतू आणि फिल्म्सच्या स्वरूपात मायक्रोप्लास्टिक्सचे सर्वाधिक प्रमाण आयोडीनयुक्त मीठामध्ये असल्याचे आढळून आले आहे.

हा रिसर्च का करण्यात आला ?

साखर आणि मीठ यामधील मायक्रोप्लास्टिक असल्याचा अहवाल आज 'टॉक्सिक्स लिंक'ने प्रसिद्ध केला. ‘टॉक्सिक्स लिंक’चे संस्थापक रवी अग्रवाल म्हणाले की, ‘आमच्या अभ्यासाचे उद्दिष्ट मायक्रोप्लास्टिक्सवरील विद्यमान वैज्ञानिक डेटाबेसमध्ये योगदान देणे हा होता. जेणेकरुन जागतिक प्लॉस्टिक करार या समस्येचे ठोस निराकरण करू शकेल.’

'टॉक्सिक्स लिंक'चे सहयोगी संचालक सतीश सिन्हा म्हणाले, 'आमच्या रिसर्चमध्ये मीठ आणि साखरेच्या सर्व नमुन्यांमध्ये मायक्रोप्लास्टिक्सचे लक्षणीय प्रमाण आढळलेय, हे चिंताजनक आहे. मानवी आरोग्यावर मायक्रोप्लास्टिक्सचे दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. त्यामुनळे यावर तातडीने आणि व्यापक संशोधनाची गरज आहे.’

suger
Types of Salt: मीठाचे 'हे' ५ प्रकार तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या कोणतं मीठ आरोग्यासाठी गुणकारी

मीठ आणि साखरेत किती प्लॉस्टिक -

कोरड्या मिठामध्ये मायक्रोप्लास्टिकचे प्रमाण 6.71 ते 89.15 तुकडे प्रति किलोग्रॅम असल्याचे आढळून आले. सर्वात जास्त प्रमाण आयोडीन असलेल्या मीठात आणि सर्वात कमी रॉक सॉल्टमध्ये प्लॉस्टिक आढळले. आयोडीनयुक्त मीठामध्ये मायक्रोप्लास्टिक्सचे प्रमाण सर्वाधिक 89.15 तुकडे प्रति किलोग्रॅम इतके आढळले. तर सेंद्रिय रॉक मिठाचे प्रमाण सर्वात कमी 6.70 तुकडे प्रति किलोग्रॅम होते.

रिसर्चनुसार, साखरेत मायक्रोप्लास्टिकची कॉन्‍सेंट्रेशन 11.85 ते 68.25 तुकडे प्रति किलोग्रॅम असल्याचे दिसून आले आहे. मायक्रोप्लास्टिक ही वाढती जागतिक चिंता आहे, कारण ते आरोग्य आणि पर्यावरण या दोघांनाही हानी पोहोचवू शकतात. हे छोटे प्लास्टिकचे कण अन्न, पाणी आणि हवेतून मानवी शरीरात प्रवेश करू शकतात. त्यामुळे आजारपणात वाढ होते. रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.

suger
Diabetes Diet : डायबिटीज रुग्णांनी 'हा' सुकामेवा खाणे टाळा, अन्यथा वाढेल रक्तातील साखर अन् येईल हार्ट अटॅक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com