स्वयंपाकघरातील मीठ एखाद्या पदार्थामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो. मीठामुळे कोणत्याही पदार्थाची चव वाढते. मीठ नसलेले पदार्थ चवीला बेचव आणि अळणी लागतात. मीठामुळे आरोग्याला देखील फायदे होतात.
निरोगी आणि तंदुरुस्त शरिरासाठी शरीरात योग्य प्रमाणात सोडियम असणं आवश्यक आहे शरीरातील सोडियममुळे तुम्हाला थकवा आणि दम्यासारख्या समस्या उद्भवत नाही. मिठाचे प्रमाण शरीरातून कमी झाल्यास तुमचं रक्तदाब कमी होतो.
बाजामध्ये अनेक प्रकारचे मीठ मिळतात ज्याचे सेवन आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. बाजार एकुण ५ प्रकारचे मीठ उपलब्ध आहेत ज्याचे सेवन आपल्या आरोग्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे काम करतं.
आयुर्वेदानुसार, सैंधव मीठ खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराला भरपूर प्रमाणात कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह आणि सेलेनियम सारखे खनिजे मिळतात. ज्यामुळे छातीत जळजळ, सूज येणे, पचन समस्या सुधारण्यास मदत होते.
सागरी मीठ समुद्राच्या पाण्याच्या मदतीनं बनवलं जाते. सागरी मीठामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम आढळतं. सागरी मीठ रॉक मिठापेक्षाही अधिक महाग असतं. सागरी मीठ हाडांचा कमकुवतपणापासून बचाव करतात.
आयोडिन मीठामध्ये भरपूर प्रमाणात आयोडिन असते ज्यामुळे थायरॉईड ग्लॅंड्सचे आरोग्य सुधारते. आयोडिन मीठचे सेवन केल्यास मेंदू, केस, नखं आणि त्वचेचं आरोग्य सुधारण्यास मदत होते.
काळ्या मिठाला सोडियम क्लोराईड देखील म्हणटले जाते. काळ्या मीठामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे तुमच्या पोटाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते त्यासोबतच रक्तदाब आणि वजन नियंत्रित रहाण्यास मदत होते.
गुलाबी मीठाचे उत्पादन हिमालयातून केले जाते. गुलाबी मीठामध्ये भरपूर खनिजे असतात. गुलाबी मीठ चवीला थोडे गोडसर लागते. या मिठाचे नियमित सेवन केल्यास रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.
Edited by: Nirmiti Rasal