Independence Day 2024: स्वातंत्र्य दिनानिमित्त स्पेशल बेत, बनवा 'तिरंगा बर्फी' अन् वाढवा गोडवा

15 August Special : उद्या स्वातंत्र्य दिन म्हणजेच आपला राष्ट्रीय सण आहे. या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी 'तिरंगा बर्फी' बनवा. साधी-सोपी झटपट बनवता येईल अशी रेसिपी नोट करा.
15 August Special
Independence Day 2024SAAM TV
Published On

तिरंगा थीममध्ये सध्या बाजारात अनेक पदार्थ पाहायला मिळत आहेत. तुम्ही सुद्धा घर बसल्या असे पदार्थ घरी बनवू शकता. यंदा १५ ऑगस्टला 'तिरंगा बर्फी' ने सर्वांच तोंड गोड करा. आपला भारतीय झेंडा हा तीन रंगांनी सजला आहे. या तिन्ही रंगांचे मोठे महत्त्व आहे. केशरी रंग त्याग, धैर्याचे प्रतीक आहे. पांढरा रंग शांती, सत्याचे प्रतीक आहे. तर हिरवा रंग निष्ठा , समृद्धीचं प्रतीक आहे. तसेच निळ्या रंगाचे अशोक चक्र न्यायाचे प्रतीक आहे. गतिमान जीवन यातून संबोधित होते.

स्वातंत्र्य दिनानिमित्त बनवता येईल अशा 'तिरंगा बर्फी' ची सिंपल रेसिपी जाणून घ्या

तिरंगा बर्फी

साहित्य

  • सुकं खोबरं

  • तूप

  • बदाम

  • काजू

  • मनुका

  • दूध

  • वेलची पावडर

  • पिठीसाखर

  • खाण्याचा केशरी आणि हिरवा रंग

  • नारळ पावडर

15 August Special
Independence Day Special Recipe : स्वातंत्र्य दिन साजरा करताना घरच्याघरी बनवा तिरंगा पुलाव; वाचा सिंपल आणि झटपट तयार होणारी रेसिपी

कृती

तिरंगा बर्फी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये सुकं खोबरं, वेलची पावडर, दूध आणि पिठीसाखर यांचे मिश्रण करून छान कणीक मळून घ्या. आता या मिश्रणाचे तीन भाग करून घ्या आणि एक भाग पांढरा ठेवा. दोन छोट्या बाऊल मध्ये उरलेले दोन भाग ठेवून एकात खाण्याचा हिरवा रंग तर दुसऱ्यात खाण्याचा केशरी रंग मिसळून परत छान पीठ एकजीव करून घ्या. आता एका प्लेटवर थोडे तूप लावून त्यावर नारळ पावडर शिंपडा. तिरंगा मधील रंगानुसार एकावर एक पिठाचे गोळे ठेवून छान आयताकृती आकार द्या. त्यानंतर सुरीच्या साहाय्याने बर्फीच्या आकाराचे तुकडे बनवून घ्या. तयार झालेली बर्फी ४ ते ५ तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवून द्या. स्वातंत्र्य दिनानिमित्त घरी आलेल्या पाहुण्यांना आणि सोसायटीमध्ये ध्वजवंदन केल्यावर सर्वांना या गोड बर्फीचा आस्वाद घ्यायला द्या.

15 August Special
Independence Day 2024 : भारतात यंदा 77वा की 78वा स्वातंत्र्य दिन साजरा होतोय? वाचा आणि कन्फ्यूजन दूर करा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com