

दिवसभर काम करून थकल्यानंतर रात्री शांत झोप मिळणं प्रत्येकासाठी महत्त्वाचं असतं. पण वास्तुशास्त्रानुसार, आपण झोपताना डोकं कोणत्या दिशेला ठेवतो याचाही तुमच्या झोपेवर आणि मनःशांतीवर परिणाम होऊ शकतो. योग्य दिशेला डोकं ठेवून झोपल्यास घरात सकारात्मक ऊर्जा राहतं, असं वास्तुशास्त्रात सांगितलं जातं. मग झोपताना डोकं नेमकं कोणत्या दिशेला असावं? जाणून घेऊया यामागचं वास्तुशास्त्र.
वास्तुशास्त्रात झोपण्याच्या दिशेला विशेष महत्त्व दिलं जातं. रात्री झोपताना आपलं डोकं कोणत्या दिशेला आहे याचा परिणाम आरोग्य, मनाची स्थिती आणि आयुष्यातील प्रगतीवर होतो अशी मान्यता आहे. अनेक जण याला केवळ एक समजूत मानतात. परंतु वास्तुशास्त्र तज्ज्ञांच्या मते, योग्य दिशेला झोपल्याने चांगली झोप लागण्यास आणि सकारात्मक ऊर्जा मिळण्यास मदत होते.
वास्तुशास्त्रानुसार, चुकीच्या दिशेला डोकं ठेवून झोपल्यास त्याचा परिणाम शरीर आणि मनावर होऊ शकतो. उत्तर दिशेला डोकं करून झोपणं योग्य मानलं जात नाही. असं केल्याने ताण, अस्वस्थपणा आणि थकवा वाढू शकतो. काही लोकांना रात्री पुरेशी झोप न लागण्याची समस्याही जाणवू शकते.
वास्तुशास्त्रानुसार, झोपताना दक्षिण दिशेला डोकं आणि उत्तर दिशेला पाय असावेत. ही झोपण्यासाठी सर्वात चांगली दिशा मानली जाते. यामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि झोपही चांगली लागते, असं सांगितलं जातं. वास्तुशास्त्राच्या जाणकारांच्या मते, या दिशेला झोपल्याने रक्तदाब संतुलित राहण्यास मदत होते.
पृथ्वीमध्ये चुंबकीय ऊर्जा असते. वास्तुशास्त्र तज्ज्ञांच्या मते, दक्षिण दिशेला डोकं करून झोपल्यास शरीरातील ऊर्जा पृथ्वीच्या नैसर्गिक ऊर्जेशी संतुलित राहते. त्यामुळे या दिशेला झोपल्याने डोकेदुखी आणि ताण कमी होण्यास मदत होते, असं सांगितलं जातं.
वास्तुशास्त्रानुसार, उत्तर दिशेला डोकं करून झोपणं टाळावं. या दिशेला झोपल्याने शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात, अशी मान्यता आहे. यामुळे मानसिक ताण वाढू शकतो आणि झोपेवरही परिणाम होऊ शकतो. काही जाणकारांच्या मते, डोकेदुखी आणि अस्वस्थपणाचाही त्रास जाणवू शकतो.
पूर्व दिशा ही सकारात्मक ऊर्जेची दिशा मानली जाते. कारण सूर्याचा उदय पूर्व दिशेला होतो. वास्तुशास्त्रानुसार, या दिशेला डोकं करून झोपल्याने मन शांत राहतं आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते. त्यामुळे विद्यार्थी आणि अभ्यास करणाऱ्या लोकांसाठी ही दिशा चांगली मानली जाते.
दक्षिण आणि पूर्व दिशेच्या तुलनेत पश्चिम दिशा झोपण्यासाठी तितकी प्रभावी मानली जात नाही. पण काही लोकांसाठी ही दिशा चांगली ठरू शकते. वास्तुशास्त्र तज्ज्ञांच्या मते, व्यवसाय आणि नोकरीमध्ये प्रगती करू इच्छिणारे लोक पश्चिम दिशेला डोकं करून झोपू शकतात. यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होते, असं मानलं जातं.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.