Office Politics : ऑफिसमधील पॉलिटिक्सला कंटाळला आहात तर 'या' टीप्स फॉलो करा

Office Tips : ऑफिसमध्ये काम करताना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. ऑफिसमध्ये प्रमोशन मिळवण्यासाठी कामात स्वतःला झोकून देणे आवश्यक आहे.
Office Tips
Office PoliticsSaam Tv

ऑफिसमध्ये राजकारण हे एक भीषण वास्तव आहे ज्याला प्रत्येक व्यक्तीला सामोरे जावे लागते. कार्यालयीन राजकारणाला सामोरे जाणे कठीण आहे कारण याचा कळत नकळत आपल्या वैयक्तिक आयुष्यात फरक पडत असतो. कार्यालयीन राजकारणात कसे जिंकायचे याचे वेगवेगळे मार्ग आहेत.

Office Tips
Lifestyle Tips : घर-नोकरी होतोय तारेवरची कसरत? 'या' टिप्स फॉलो करा

ऑफिसमधील राजकारणाचा सामना करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे शक्य तेवढं दुर्लक्ष करायला शिका. कामाच्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीत तुमचा सहभाग असणं आवश्यक नाही. त्यामुळे कार्यालयीन राजकारणाचा आनंद घेणाऱ्या लोकांपासून सावध असले पाहिजे.

शांतपणे (quiet)आपण करत असलेल्या कामाचा पूर्ण आढावा घ्यावा. हे काम करणे आवश्यक का आहे? तसेच ते न केल्यामुळे काय काय परिणाम संभवतात या सर्वांची मनामध्ये कल्पना करून पहावी. काम करण्याच्या पद्धतीमध्ये बदल करून पहावा. या गोष्टींचा अवलंब केल्यास ऑफिसमधील राजकारण तुम्ही टाळू शकता.

ऑफिसमधील राजकारणात कसे जिंकायचे?

१) गॉसिप करू नका -

तुम्हालाही ऑफिस पॉलिटिक्सपासून लांब राहायचं असेल तर कोणाबद्दलही गॉसिप करू नका. कोण कधी कोणाचा खास होऊन तुम्ही सांगितलेल्या गोष्टींचं भांडवल करेल हे सांगता येत नाही त्यामुळे शक्यतो गॉसिप टाळा.

२) चांगले वागा -

ऑफिसमध्ये सर्वांशी प्रेमाने बोला, चांगलं बोला. विनाकारण उर्मटपणे बोलू नका. जेणेकरून समोरचा व्यक्तीही तुमच्याशी आदराने बोलेल.

३) शांत राहा -

ऑफिसमध्ये (office)शांत राहणं खूप गरजेचं आहे. कोणाशी वाद घालत बसण्यापेक्षा त्या वादाचा परिणाम किती काळ राहील याचा विचार करा.

४) दुर्लक्ष करायला शिका -

प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं महत्त्वाचं नाही. काही गोष्टी दुर्लक्षित केल्याने अनेक समस्या नाहीशा होतात. समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याने आपल्या आयुष्यात फरक पडू देऊ नका. तुमचं काम करत राहा.

५) आदर करा -

ऑफिसमधील प्रत्येक व्यक्तीला आदर द्या. सर्वांना समान वागणूक द्या त्यामुळे तुमचे ऑफिसमधील सहकाऱ्यांशी चांगले सबंध निर्माण होतील.

६) मर्यादा ठेवून वागा -

तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काई घडतं हे ऑफिसमध्ये कोणालाही सांगू नका. प्रत्येक व्यक्ती समान नसतो त्यामुळे कोणीही तुमच्या बाबतीत अंदाज बांधणार नाही.

७) माणसांची निवड -

ऑफिसमध्ये अतिशय काळजीपूर्वक माणसं निवडा. ऑफिसमधल्या वातावरणाची त्यांची मतं आधी जाणून घ्या आणि मगच समोरच्या व्यक्तीला मित्र (friends)बनवा.

ऑफिसमध्ये सहकारी आणि वरिष्ठ यांच्याबरोबर संवाद साधा तसचं तुमचं म्हणणं आत्मविश्वासानं मांडण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कार्यालयाची जागा कधीही राजकारणापासून मुक्त होणार नाही त्यामुळे वरील सात टिप्स फॉलो केल्यास तुम्ही सुद्धा ऑफिसमधील राजकारण टाळू शकता.

Office Tips
Lifestyle To Prevent Cancer: कर्करोग टाळाण्यासाठी जीवनशैलीत करा 'हे' छोटे बदल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com