Shreya Maskar
कोकणाला स्वर्गाहून सुंदर असा समुद्रकिनारा लाभला आहेत.
पावसात शांत समुद्रकिनाऱ्याला भेट द्यायची असल्यास कोकणातील 'या' समुद्रकिनारी आवर्जून फेरफटका मारा.
कोकणातील देवगडजवळील मिठबाव-तांबळडेग हा शांत समुद्रकिनारा आहे.
येथील निळाशार समुद्रकिनारा पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो.
या समुद्रकिनाऱ्याजवळ गजबादेवी मंदिर हे लोकप्रिय ठिकाण आहे.
मऊ आणि चमकदार वाळू हे या समुद्रकिनाऱ्याचे वैशिष्ट्य आहे.
हा समुद्रकिनारा फोटोशूटसाठी उत्तम ठिकाण आहे.
या समुद्रकिनारी देवगड किल्ला, कुणकेश्वर मंदिर, बागायत बीच अशी अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत.
कोकणातील देवगड तालुक्यात तुम्ही ट्रेन किंवा लक्झरी गाडीने जाऊ शकता. तेथून टॅक्सीने प्रवास करून तुम्हाला या समुद्रकिनाऱ्याला भेट देता येईल.
देवगडचे हापूस आंबे जगभरात प्रसिद्ध आहे.