Skin cancer symptoms: त्वचेवर अचानक ही ५ लक्षणं दिसली तर लगेच व्हा सावध, असू शकतो कॅन्सरचा धोका

skin cancer symptoms risk precautions: तज्ज्ञांच्या मते, त्वचेवर अचानक काही बदल दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. ही लक्षणे त्वचेच्या कर्करोगाचे संकेत असू शकतात. वेळेवर निदान आणि उपचार केल्यास गंभीर परिणाम टाळता येतात.
skin cancer symptoms risk precautions
skin cancer symptoms risk precautionsSAAM TV
Published On

आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये वाढलेला एक आजार म्हणजे लंग कॅन्सर. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, लंग कॅन्सरची लक्षणं ही तुमच्या त्वचेवर देखील दिसून येतात. जर ही लक्षणं ओळखळी तर हा गंभीर आजार ओळखण्यास मदत होऊ शकते.

फुफ्फुसाचा कॅन्सर हा फुफ्फुसांवर परिणाम करतो. हा आजार श्वसनमार्गाच्या अस्तरातील पेशींमध्ये किंवा फुफ्फुसातील air sacs मध्ये निर्माण होतो. या ठिकाणी असामान्य पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात. त्यामुळे हा आजार होतो. फुफ्फुसांच्या कॅन्सरचे दोन प्रकार असून ते नॉन-स्मॉल सेल लंग कॅन्सर (NSCLC) आणि स्मॉल सेल लंग कॅन्सर (SCLC) आहेत.

skin cancer symptoms risk precautions
Heart attack causes: एका रात्रीत हार्ट अटॅक येत नाही! धुम्रपान, कोलेस्ट्रॉल सोडून 'या' साध्या गोष्टी वाढवतात धोका

त्वचेवर अचानक गाठी दिसणं

लंग कॅन्सर हा रक्तप्रवाहाद्वारे तुमच्या शरीरात पसरतो. अशावेळी मेटास्टॅटिक नोड्युल्सच्या गोल गाठी त्वचेवर निर्माण होतात. या गाठी रबरासारख्या कडक वाटतात. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, छाती, पाठ, मान किंवा डोक्याच्या त्वचेवर या गाठी दिसून येतात. काही वेळा या गाठींमध्ये अल्सर होऊ शकतो किंवा त्या फुटू शकतात. या गाठी म्हणजे कॅन्सर फुफ्फुसांच्या पलीकडे पसरल्याचं लक्षण मानलं जातं.

त्वचेवर रॅशेज येणं

लंग कॅन्सरमध्ये रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होऊन त्वचेवर पुरळ किंवा खाज येऊ शकते. याला erythema gyratum repens असं म्हटलं जातं. ही पुरळ प्रामुख्याने रूग्णाच्या पाठीवर दिसून येते. आणखी एक लक्षण म्हणजे dermatomyositis. यामध्ये डोळ्यांभोवती जांभळट लालसर पुरळ दिसते.

skin cancer symptoms risk precautions
Heart Attack Tips : सतर्क राहा! हार्ट अटॅक आल्यावर घरात एकटे असताना काय करावं, हे जाणून घ्या

कावीळ

लंग कॅन्सर हा इतर अवयवांमध्ये पसरतो. यामध्ये तो लिव्हरही पसरण्याचा धोका असतो. जर तो लिव्हरमध्ये पसरला तर पित्तनलिकांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. यामुळे व्यक्तीला कावळी होऊ शकते. अशावेळी डोळे आणि त्वचा देखील पिवळी होते. कावीळीसोबत वजन घटलं तर तातडीने डॉक्टरांची मदत घ्यावी.

बोटांच्या कडांमध्ये बदल

लंग कॅन्सरची लक्षणं बोटांवरही दिसून येतात. याला वैद्यकीय भाषेत क्लबिंग असं म्हणतात. यामध्ये बोटांच्या टोकांवरील त्वचा आणि नखं गोलसर किंवा फुगलेली दिसतात. त्याचप्रमाणे काही रूग्णांची नखं वाकलेली दिसू शकतात. लंग कॅन्सरमुळे ऑक्सिजनची पातळी कमी होते आणि त्याचा परिणाम बोटांच्या टोकांवरील टिश्यूंवरव होतो.

skin cancer symptoms risk precautions
Heart attack risk: पहाटेच्या वेळी हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त? 'या' एका कारणामुळे येतो हार्ट अटॅक

त्वचेवर बदल होणं

लंग कॅन्सरमुळे तुमच्या त्वचेमध्ये देखील बदल होतो. यामध्ये हाताच्या तळव्यांवर जाडसर, पट्टे दिसून येतात. इतकंच नाही तर किंवा मान आणि त्वचेवर काळसर डाग दिसून येतात. हे दोन्ही बदल फुफ्फुसाच्या कॅन्सरशी संबंधित असतात. कारण ट्यूमरमधून काही विशिष्ट हार्मोन्स किंवा पदार्थ तयार होतात.

skin cancer symptoms risk precautions
Heart Attack: विशी, तिशी आणि चाळिशीतच हार्ट अटॅकचा धोका; फक्त या ५ गोष्टी कराल तर मरणातून वाचाल!

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com