Heart Attack Tips : सतर्क राहा! हार्ट अटॅक आल्यावर घरात एकटे असताना काय करावं, हे जाणून घ्या

Heart Attack Early Signs: जर तुम्ही घरी एकटे असाल आणि हार्ट अटॅकची लक्षणं जाणवत असतील, तर स्वत:चं रक्षण कसं कराल याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेला महत्त्वाचा सल्ला नक्की वाचा.
heart attack
emergency heart caregoogle
Published On
Summary

हार्ट अटॅकची मुख्य लक्षणं जाणून घ्या.

घरी एकटे असाल तर लगेच रुग्णवाहिका बोलवा आणि दरवाजा उघडा ठेवा.

उभं न राहता पाठीवर झोपा, शक्य असल्यास अ‍ॅस्पिरीन चघळा.

प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. घाबरून न जाता शांत राहा आणि योग्य पावलं उचला.

सध्याच्या जीवनशैलीमुळे हार्ट अटॅकचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. अगदी तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत हार्ट अटॅक येण्याच्या समस्या आपण पाहत असतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही घरात एकटे असाल आणि तुम्हाला हार्ट अटॅकची लक्षणे जाणवल्यास तुम्ही पुढील तज्ज्ञांचे सल्ले घेऊ शकता.

जेव्हा एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक येतो. तेव्हा तिला काहीच कळत नाही. तसेच छातीत येणाऱ्या कळेकडे लक्ष जाते. अशा परिस्थितीत स्वत: ला वाचवण्यासाठी त्वरित योग्य पाऊल उचलणे महत्वाचे आहे. कारण या समस्यायेतील प्रत्येक सेकंद महत्वाचा आहे. मानेसर येथील फोर्टीस हॉस्पिटलचे कार्डीयाक सर्जरी विभागातील डॉ. महेश वाधवानी यांनी काही महत्वाचे सल्ले दिले आहेत.

heart attack
26 July 2005 Mumbai Flood : २६ जुलै! मुंबईकरांचं आयुष्य बदलून टाकणारा दिवस; २० वर्षांपूर्वीच्या पुराचे PHOTO पाहा

हदयरोगाच्या विशिष्ट लक्ष द्या. समजा चालताना छातीत दुखणे, थोडेसे काम केल्याने थकने. किंवा अचानक श्वास घेण्यास त्रास होणे. घाबरल्या सारखे वाटणे. अशी कोणतीही लक्षणे असल्यास डॉक्टरांकडे धाव घ्या. तसेत ताबडतोब रुग्णवाहिका बोलवा. तुम्ही १०८ किंवा ११२ या क्रमांकावरून रुग्णवाहिका बोलवू शकता.

घरातले लाईट्स चालू ठेवा. दरवाजा उघडा ठेवा. अशा वेळेस अजीबात उभे राहू नका. पाठीवर झोपा. जमल्यास शेजारचे किंवा नातेवाईकांना कॉल करा. तुम्ही अॅस्पिरिम चघळू शकता. अशा प्रकारे स्वत: चा बचाव करा.

heart attack
UPI New Rules 2025 : UPI वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; हे 3 नियम 1 ऑगस्टपासून लागू
Q

हार्ट अटॅक येतोय असं कसं ओळखायचं?

A

छातीत अचानक वेदना, श्वास घेण्यास त्रास, घाम येणे, थकवा, चक्कर येणे ही लक्षणं आढळतात.

Q

जर घरात एकटे असताना हार्ट अटॅक आला, तर पहिलं काय करावं?

A

लगेच 108 किंवा 112 या नंबरवरून रुग्णवाहिका बोलवा. शक्य असल्यास नातेवाईकांना कॉल करा. दरवाजा उघडा ठेवा.

Q

शरीराची कोणती स्थिती योग्य असेल अशावेळी?

A

पाठीवर झोपा. उभं राहू नका किंवा हालचाल टाळा. शक्य असल्यास प्रकाश (लाईट्स) चालू ठेवा.

Q

औषध म्हणून काही तातडीचा पर्याय आहे का?

A

होय, अ‍ॅस्पिरीन गोळी चघळल्याने रक्ताच्या गाठी बनण्याचा धोका कमी होतो. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणं योग्य.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com