
२६ जुलै २००५ हा दिवस मुंबईकर कधीच विसरणार नाहीत. आजही या दिवसाची आठवण लाखो मुंबईकरांच्या मनात आहे.
२६ जुलै २००५ मध्ये मुंबई पुराच्या पाण्यात अक्षरश न्हावून निघाली होती. मुंबईला पावसाने झोडपले होते.
२६ जुलैच्या या पावसात अनेक मुंबईकरांना आपला जीव गमवावा लागला. रस्त्याने जाताने अनेक ठिकाणी पाय घसरुन नागरिक पडले.
मुंबईत झालेल्या सर्वाधिक पावसापैकी हा एक आहे. मुंबईमध्ये आलेल्या या भयानक पुरात मोठी नैसर्गिक आपत्ती आली होती.
२६ जुलै २००५ मध्ये दिवसभरात ९४४ मीमी पाऊस पडला होता. हा पाऊस १०० वर्षातला सगळ्यात भयानक पाऊस होता.
भयानक पावसामध्ये रेल्वे रुळावर पाणी ओसंडून वाहत होते. त्यावेळेस ट्रेन थांबवण्यात आल्या होत्या. त्यामुळे ५२ लोकलचं नुकसान झालं होतं. आजवरच्या इतिहासात फक्त एकदाच मुंबई लोकल बंद होती.
वाढत्या पावसात मुंबईतील ३७,००० रिक्षा, ४,००० टॅक्सी आणि ९०० BEST बसचं नुकसान झालं होतं.
इतिहासात पहिल्यांदाच विमानतळ २६ जुलै २००५ रोजी ३० तासांपेक्षा अधिक काळ बंद ठेवावे लागले होते. मुलांच्या शाळा कॉलेज बंद करण्यात आले होते. लोकांची घरच्यातील सामान वाहून गेले होते.