Heart Attack: विशी, तिशी आणि चाळिशीतच हार्ट अटॅकचा धोका; फक्त या ५ गोष्टी कराल तर मरणातून वाचाल!

heart attack risk twenties thirties forties: तज्ज्ञांच्या मते, हृदयविकाराचा झटका हा केवळ वृद्धांमध्येच नव्हे तर तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. वयाच्या वीस, तीस आणि चाळीस वर्षांत जीवनशैलीतील बदल, ताणतणाव, चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
heart attack risk twenties thirties forties
heart attack risk twenties thirties fortiessaam tv
Published On

अजूनही अनेकांचा असा समज आहे की, हार्ट अटॅक हा फक्त प्रौढ किंवा वयस्कर व्यक्तींना येतो. मात्र ही गोष्ट आता बदलली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये विशी, तिशी आणि चाळीशीच्या व्यक्तींना देखील हार्ट अटॅक येत असल्याचं समोर आलं आहे. तासन् तास एकाच जागेवर बसणं, ताणतणाव, धुम्रपान यामुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो. मात्र जर वेळेत पावलं उचलली तर हा धोका टाळता येऊ शकतो.

चेन्नईमधील वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राघवेंद्र अय्यर यांनी सांगितलं की, तरूणांचं हार्ट कधीही अचानक फेल होत नाही. हृदयाच्या समस्या दिसून येण्यापूर्वी नेहमी शरीर काही ना काही सिग्नल देत असतं. मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं जातं.

heart attack risk twenties thirties forties
Cervical Cancer: या लक्षणांना इग्नोर केल्यास वाढतो सर्वायकल कॅन्सरचा धोका; कोणत्या महिलांना असतो अधिक धोका?

हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यासाठी डॉक्टरांनी सांगितल्यात काही टीप्स

लक्षणांकडे गांभीर्याने पाहा

छातीमध्ये जडपणा वाटणं, श्वास घेताना त्रास होणं, थकवा किंवा मळमळ अशी लक्षणं दिसली की सहसा तरूण मंडळी एसिडीटी किंवा ताण समजून दुर्लक्ष करतो. मात्र याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. डॉ. अय्यर यांनी सांगितलं की, वय हे तुम्हाला हृदयात होणाऱ्या electrical problems पासून संरक्षण देत नाही. जर तुम्हाला ही लक्षणं वारंवार दिसली तर त्याकडे दुर्लक्ष न करता योग्य त्या तपासण्या करून घेणं गरजेचं आहे.

ताणावर नियंत्रण मिळवा

सततच्या ताणाचा परिणाम तुमच्या रक्तदाबावर होतो. यामुळे रक्तदाब वाढून स्ट्रेस हार्मोनच्या पातळीचही वाढ होते. डॉ. अय्यर सांगतात की, मी ३० आणि ४० तील अनेक रूग्णांना पाहिलंय. त्यांच्या धमन्या चांगल्या असतात मात्र हृदयावर प्रचंड ताण असतो. ताण हा हृदयाच्या electrical system वर परिणाम करतं. अशावेळी योगाभ्यास, डायरी लिहिणं किंवा स्क्रिनपासून थोडं दूर राहणं तुम्हाला मदत करेल.

heart attack risk twenties thirties forties
Water Bottle Facts: पाण्याच्या बाटलीला वेगवेगळ्या रंगाची झाकणं का असतात? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

हृदयासाठी चांगली असेल अशी जीवनशैली जोपासा

कमी झोप आणि अयोग्य आहार घेतल्यास हृदयाच्या ठोक्यांमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला हृदयाचं संरक्षण करायचं असेल तर तुम्ही योग्य जीवनशैली जोपासली पाहिजे. यामध्ये दररोज ७-८ तासांची झोप घेणं आणि चांगला आहार घेणं गरजेचं आहे.

जास्त नाही पण व्यायाम करा

तुमच्या हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी सर्वात बेस्ट गोष्ट म्हणजे शारीरिक व्यायाम. मात्र जीमप्रमाणे एकदम तीव्र पद्धतीचा व्यायाम तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो. डॉक्टरांनी सांगितलं की, व्यायामाने हृदयाला मदत झाली पाहिजे. त्याने त्रास होता कामा नये. अशावेळी तुम्ही एरोबिक एक्सरसाईज आणि लवचिकता वाढवणारे व्यायाम केले पाहिजेत.

heart attack risk twenties thirties forties
Dehydration despite drinking water: 3 लीटर पाणी प्यायल्यानंतरही डिहायड्रेशनचा त्रास होतोय? वाचा काय आहेत यामागची कारणं

हृदयाच्या समस्या जाणून घेण्यासाठी वेळेत तपासणी करा

लवकर हार्ट अटॅक येण्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत असतात. यामध्ये उच्च रक्तदाब, जास्त कोलेस्टेरॉल, मधुमेह किंवा आनुवंशिक हृदयविकार यांचा समावेश आहे. डॉ. अय्यर यांनी सांगितलं की, सर्वात मोठी चूक म्हणजे लक्षणांची वाट पाहणं. त्याऐवजी तपासणी करणं गरजेचं आहे. जर तुमच्या कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास आहे तर रक्तदाब मोजणं, कोलेस्ट्रॉलची पातळी तपासणं आणि बेसलाइन ईसीजी या तपासण्या करून घ्याव्यात.

heart attack risk twenties thirties forties
Brain shrinking: कमी पाणी पिणाऱ्यांचा मेंदू होतोय हळूहळू छोटा; नव्या अभ्यासातून धक्कादायक बाब समोर

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com