Ideal Weight By Age: वयानुसार किती असायला हवं तुमचं वजन? चार्ट पाहा आणि एकदा चेक करा

Correct Weight for All Age: प्रत्येक वयोगटासाठी एक विशिष्ट प्रमाणात वजन असणं आवश्यक असतं, ज्यामुळे शरीराची कार्यक्षमता सुरळीत राहते. त्यामुळे आपलं वजन वयानुसार योग्य आहे का, हे जाणून घेणं आवश्यक ठरतं.
Ideal Weight By Age
Ideal Weight By Agesaam tv
Published On

वजन आणि शरीराची रचना हे एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याचा महत्वाचा भाग आहे. हे केवळ आपल्या शारीरिक स्थितीवरच परिणाम करत नाही तर आपली जीवनशैलीसाठी देखील निर्धारित करतं. प्रत्येक वयोगटासाठी एक वजन असावं, जेणेकरून शरीराचे कार्य योग्यरित्या चालू राहू शकतं. अशा परिस्थितीत आपल्या वयानुसार वजन किती असावं हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे.

वजन नियंत्रणात ठेण्याचे फायदे

केवळ दिसण्यासाठी वजन नियंत्रणात ठेवायचं नाही तर ते आरोग्याच्या दृष्टीने देखील गरजेचं आहे. वाढतं वजन ही आजकाल एक सामान्य समस्या बनलीये. ज्यामुळे अनेक प्रकारचे आजार मागे लागू शकतात. लठ्ठपणामुळे केवळ आपल्या शारीरिक हालचालींवरच परिणाम होत नाही तर यामुळे हृदय, रक्तदाब, मधुमेह या समस्या देखील उद्भवू शकतात.

वयोमानानुसार तुमचं वजन किती असलं पाहिजे?

वजनासाठी कोणतंही निश्चित असं मानक नाही, कारण ते वेगवेगळ्या वयोगट आणि शरीराच्या रचनेवर अवलंबून असतं. परंतु तरीही काही सामान्य मार्गदर्शक तत्त्वं आहेत, ज्यांच्या माध्यमातून तुमच्या शरीराचं वजन किती असलं पाहिजे हे तुम्ही जाणून घेऊ शकता.

Ideal Weight By Age
Liver Disease : चेहऱ्यावर दिसतात लिव्हर खराब होण्याची ही 4 लक्षणे; दुर्लक्ष करु नका, अन्यथा...

वय आणि वजनाचा सामान्य चार्ट-

  • उंची ४ फूट १० इंच असेल तर तुमचं वजन ४१ ते ५२ किलो असलं पाहिजे.

  • उंची ५ फूट असेल तर वजन ४४ ते ५५.७ किलो पाहिजे.

  • उंची ५ फूट २ इंच असेल तर वजन ४९ ते ६३ किलो असणं उत्तम.

  • उंची ५ फूट ४ इंच असेल तर वजन ४९ ते ६३ किलो असणं गरजेचं आहे.

  • उंची ५ फूट ६ इंच उंचीच्या व्यक्तीचे वजन ५३ ते ६७ किलो असावं.

  • उंची ५ फूट ८ इंच असेल तर तुमचं वजन ५६ ते ७१ किलो दरम्यान असणं गरजेचं आहे.

  • उंची ५ फूट १० इंच असल्यास वजन ५९ ते ७५ किलो दरम्यान असावं.

  • उंची ६ फूट असेल तर आपले वजन ६३ ते ८० किलो दरम्यान असावं.

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे?

हेल्दी डाएट

वजन कमी करण्यासाठी योग्य आहार असणं खूप गरजेचं आहे. फळं, भाज्या आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. जेणेकरून वजन नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते.

Ideal Weight By Age
Kidney Damage: किडनी निकामी होण्यापूर्वी लघवीमध्ये दिसतात 'ही' लक्षणं, 99% लोकं सामान्य समजून करतात दुर्लक्ष

व्यायाम

दररोज किमान ३०-४५ मिनिटं व्यायाम करणं गरजेचं आहे. यामुळे शरीरात जमा झालेलं अतिरिक्त फॅट बर्न होतं.

झोप

वजन नियंत्रित करण्यासाठी 8 तासांची पुरेशी झोप खूप आवश्यक आहे. कमी झोपेमुळे वजन वाढण्याचा धोका अधिक असतो. यामुळे आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

जंड फूट खाणं टाळा

जास्त प्रमाणात जंक फूड खाल्ल्याने फॅट वाढू लागतं. यामुळे हृदयविकारचा त्रास होऊ शकतात. त्यामुळे जंक फूड खाणं टाळलं पाहिजे.

Ideal Weight By Age
Health Tips: महिलांनो...थांबून-थांबून लघवी होण्याचा त्रास होतोय? 'या' 4 गंभीर आजारांचं असू शकतं लक्षण

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com