Liver Disease
Liver DiseaseSaam Tv

Liver Disease : चेहऱ्यावर दिसतात लिव्हर खराब होण्याची ही 4 लक्षणे; दुर्लक्ष करु नका, अन्यथा...

Liver Disease Symptoms : लिव्हरमध्ये कोणताही अडथळा आला तर आपल्याला हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजार, कर्करोग आणि मधुमेहाचा आजार जडू शकतो.
Published on

Fatty Liver Cause Symptoms On The Face :

लिव्हर हा आपल्या शरीरातील महत्त्वपूर्ण भाग आहे. फॅटी लिव्हरची समस्या हल्ली प्रत्येकाला आहे. जेव्हा लिव्हरमध्ये अतिरिक्त चरबी जमा होते तेव्हा याचा सामना करावा लागतो.

लिव्हरमधील कोणतीही समस्या ही आपल्या संपूर्ण आरोग्यावर परिणाम करते. अन्न पचवण्यासोबतच शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी लिव्हर मदत करते. जर लिव्हरमध्ये कोणताही अडथळा आला तर आपल्याला हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजार, कर्करोग आणि मधुमेहाचा आजार जडू शकतो. परंतु, बरेचदा आपले लिव्हर खराब झाले आहे की, नाही हे कळत नाही.

Liver Disease
Avoiding Salt One Month : महिनाभर मीठ खाल्लं नाही तर? आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

लिव्हरच्या आजाराची (Disease) लक्षणे सुरुवातीला दिसत नाही, जेव्हा ते काम करणे थांबवते तेव्हा त्याची लक्षणे दिसू लागतात. जाणून घेऊया चेहऱ्यावर कोणती लक्षणे दिसतात

1. चेहऱ्यावर दिसणारी लक्षणे (Symptoms)

  • त्वचा आणि डोळे पिवळे पडणे.

  • त्वचा लाल होणे.

  • धाग्यासारख्या लहान नसा दिसणे.

  • रोसेशिया (चेहऱ्यावर लाल, पू भरलेले पुरळ)

2. ही लक्षणे चेहऱ्यावर का दिसतात?

डॉक्टरांच्या मते, जेव्हा यकृत (Liver) खराब होते तेव्हा त्याची लक्षणे दिसतात. परंतु, जेव्हा लिव्हरचे कार्य योग्य रित्या होत नाही तेव्हा ते शरीरातील पित्तचे तपकिरी- पिवळे रंगद्रव्य बाहेर टाकत नाही. ज्यामुळे त्वचा आणि डोळे पिवळे होतात. त्यामुळे कावीळचा सामना करावा लागतो.

Liver Disease
Money Saving Tips : महिना संपण्यापूर्वीच पाकीट खाली होतंय? अशी करा बचत

3. डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

चेहऱ्यावर ही लक्षणे दिसल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तज्ज्ञांच्या मते जेव्हा लिव्हरची समस्या वाढते तेव्हा त्याची लक्षणे डोळ्यांमध्ये दिसू लागतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com