Money Saving Tips : महिना संपण्यापूर्वीच पाकीट खाली होतंय? अशी करा बचत

कोमल दामुद्रे

महिना संपण्यापूर्वीच पाकीट रिकाम होते

बरेचदा महिना संपण्याआधीच आपलं पाकीट रिकामी होते त्यामुळे उर्वरित महिना कसा काढायचा हा प्रश्न पडतो.

कशी कराल बचत?

जर तुम्हालाही पैसे वाचवून ते बचत करायचे असतील तर या गोष्टी जरुर लक्षात ठेवा.

प्रवास

जर तुम्ही विनाकरण प्रवास करत असाल तर तो टाळा. ज्यामुळे तुमच्या पैशांची बचत होईल.

बाहेरचे खाणे टाळा

दररोज बाहेरचे खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय बाहेरचे अन्नपदार्थ खाल्ल्याने खिशावरही मोठा परिणाम होतो. त्यामुळे बाहेरचे खाणे टाळले तर पैशांची बचत होईल.

खरेदी

अनेक वेळा लोक खरेदीसाठी जातात आणि एमआरपीनुसार वस्तू खरेदी करतात. तसेच आवश्यक त्या ठिकाणी सवलत मिळवण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे बचत होईल.

सार्वजनिक वाहतूक

इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे, स्वत:च्या वाहनांचा वापर करु नका. अशावेळी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा ज्यामुळे बचत होईल.

सब्सक्रिप्शन

अनेकदा आपण ओटीटी प्लाटफॉर्मचे सब्सक्रिप्शन खरेदी करतोय. यामुळे पैसे अधिक खर्च होतात. गरज असेल तर ते घ्या.

वीज बिल

घरातील वीज किती प्रमाणात वापरताय किंवा त्याचा अधिक वापर होतो हे देखील पाहा. अनेक वेळा विजेचे बिल खूप जास्त येते. त्यामुळे जास्तीचे पैसे मोजावे लागतात.

खर्च

एका महिन्यात तुमचा खर्च तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त नसावा हे लक्षात ठेवा. यामुळे खर्च वाढतो. अशा परिस्थितीत, आपल्या खर्चावर लक्ष ठेवणे खूप महत्वाचे आहे, तरच आपण बचत करू शकाल.

बजेट

दर महिन्याला बजेट बनवा. यामुळे एका महिन्यात किती बचत करू शकतात हे जाणून घेण्यास मदत होईल.

Next : पुण्यातील बेस्ट रोमँटीक कपल्स स्पॉट, प्रेमीयुगुलांसाठी स्वर्गच जणू