कोमल दामुद्रे
शरीरासाठी सर्व प्रकारची जीवनसत्त्व आणि खनिजे महत्त्वाची असतात.
मीठाशिवाय कोणत्याही पदार्थाला चव येत नाही.
पण जर ३० दिवस तुम्ही मीठ खाल्लेच नाही तर शरीरावर काय परिणाम होतील जाणून घेऊया.
महिनाभर मीठ न खाल्ल्याने डिहायड्रेशनची समस्या उद्भवते.
मीठाचे सेवन न केल्याने जिभेची चव बदलते ज्यामुळे आपण काय खातो हे कळत नाही.
शरीरातील इलेक्ट्रोलाइटचे संतुलन बिघडू लागते. स्नायू कमकुवत होतात.
मीठाच्या कमतरेतमुळे डिहायड्रेशन, उलट्या, चक्कर येणे, मळमळ यासारख्या समस्या उद्भवू लागतील.
WHO नुसार दररोज 5 ग्रॅम मीठ खाणे आवश्यक आहे. यापेक्षा जास्त प्रमाणात सेवन केल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात.
हृदय किंवा यकृताशी संबंधित समस्या असलेल्यांनी मीठाचे सेवन कमी प्रमाणात करावे