ब्लड प्रेशर वाढताच शरीरात होतात महत्त्वपूर्ण बदल; वेळीच लक्ष द्या

Surabhi Jayashree Jagdish

रक्तदाब

ज्यावेळी तुमच्या शरीरात रक्तदाब वाढतो तेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये जलग गतीने रक्त प्रवाह सुरु होतो.

हृदयविकाराचा झटका

उच्च रक्तदाबामुळे हृदयावर दाब पडतो. परिणामी हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक यांसारख्या हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता वाढते.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, जेव्हा रक्तदाब खूप जास्त असतो तेव्हा डोकेदुखीची समस्या वेगाने वाढते.

छातीत वेदना

छातीत दुखत असेल तसंच श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा हृदयाचे ठोके असामान्य झाले असतील, तर ही देखील उच्च रक्तदाबाची मोठी लक्षणे आहेत.

चक्कर येणं

जेव्हा लोकांना उच्च रक्तदाब असतो तेव्हा त्यांना चक्कर येण्याची समस्याही जाणवते. कधीकधी मळमळ सोबत उलट्या होतात.

धुसर दृष्टी

जर तुमची दृष्टी धूसर होत असेल तर तुमचा बीपी वाढण्याची शक्यता आहे.

नाकातून रक्त येणं

नाकातून रक्त येणं आणि कानात आवाज येणं हे देखील उच्च रक्तदाबाच्या लक्षणांमध्ये समाविष्ट आहे.

सिमेंटशिवाय कसा उभा राहिला ताजमहाल? ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

येथे क्लिक करा