Husband Wife Relationship Tips : बायको रुसून माहेरी गेली? या टिप्सने स्वत: धावतपळत घरी येईल

Relationship Tips : पत्नी माहेरी गेल्यावर तिच्यावर जीवापाड प्रेम असलेल्या पतीला हा दुरावा सहन होत नाही. त्यामुळे रुसलेल्या पत्नीला मनवण्यासाठी आम्ही काही टिप्स आणल्या आहेत.
Relationship Tips
Husband Wife Relationship TipsSaam TV
Published On

पती पत्नीच्या नात्यात सतत काही ना काही कारणावरून भांडणे होत असतात. भांडण झाल्यावर आजही अनेक ठिकाणी पत्नी घर सोडून आपल्या माहेरी निघून जाण्याचा घटना घडतात. आता पत्नी माहेरी गेल्यावर तिच्यावर जीवापाड प्रेम असलेल्या पतीला हा दुरावा सहन होत नाही. त्यामुळे रुसलेल्या पत्नीला मनवण्यासाठी आम्ही काही टिप्स आणल्या आहेत.

Relationship Tips
Relation Tips : सततच्या भांडणाने नात्यातला दुरावा वाढतोय? मग 'या' टीप्स फॉलो करा

सासरी जा आणि पत्नीशी बोला

सर्वात आधी सासरी जा आणि पत्नीची माफी मागा. इगो न बाळगता आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी माफी मागितल्याने नातं तुटणार नाही. तसेच माफी मागताच पत्नी देखील जुनी भांडणे विसरून पुन्हा सासरी येईल.

चूक समजून घ्या

प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काही ना काही चुका करत असतो. त्यामुळे जर पत्नीने मोठी चूक केली असेल तर तिने असं नेमकं का केलं? त्या मागे काय कारण आहे? या प्रश्नांची उत्तरे आधी शोधा. त्याने पत्नी बद्दल तुमच्या मनातला राग दूर होईल आणि पत्नी सुद्धा पुन्हा तुमच्याकडे येईल.

पत्नीसाठी एखादं गाणं गा

अनेकदा भांडणं फार शुल्लक कारणावरून होतात. मात्र वाद बराच टोकाला पोहचतो. आता तुमच्याबरोबर सुद्धा असं झालं असेल तर तुम्ही पत्नीसाठी तिच्या आवडीचं एखादं गाणं गा. त्याने दोघांच्या डोक्यावरील ताण कमी होईल.

पत्नीला चॉकलेट्स आणि कपडे घेऊन द्या

महिलांना शॉपिंग करायला फार आवडतं. तुमच्या पत्नीला सुद्धा शॉपिंग आवडत असेल तर तिच्यासाठी काही सुंदर कपडे आणि चॉकलेट्स घेऊन जा. आता तुम्ही घेऊन गेलेले कपडे पत्नीला आवडले नाही तरी तुम्ही तिच्यासाठी केलेली धडपड पाहून तिचा राग क्षणात गायब होईल.

आजारपणाचे नाटक करा

पत्नी रुसून माहेरी गेली असेल तेव्हा तिला मनवण्यासाठी तुम्ही अनेक उपाय केले मात्र तरीही पत्नी घरी येत नसेल तर हा शेवटचा उपाय नक्की काम करेल. प्रत्येक महिलेला आपल्या पतीचा कितीही राग आला तरी पती दीर्घायुष्य जगावा यासाठी ती प्रार्थना करत असते. त्यामुळे पत्नीला पुन्हा सासरी आणण्यासाठी आजारी असल्याचे नाटक करा. आता पत्नीचं खरंच तुमच्यावर प्रेम असेल तर ती धावतपळत तुमच्याकडे निघून येईल.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे.

Relationship Tips
Family Relations : कुटुंबातील 'या' गोष्टी प्रत्येक सदस्याने पाळल्या पाहिजेत; घरात कायम आनंद आणि सुख शांती नांदेल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com