Kitchen Tips: पावसाळ्यात घरातील लाकडी वस्तुंची काळजी कशी घ्यावी ?

Kitchen Tips: आपल्यापैंकी प्रत्येकाच्या घरात अनेक लाकडी वस्तू आढळतात. तर कधी स्वयंपाक घरातही लाकडी वस्तू दिसून येतात.
Kitchen Tips
Cleaning of wooden items Saam Tv

पावसाळा म्हटलं की मस्त गरम चहा, गरमागरम भजी आणि पावसाची गाणी अजून काय पाहिजे.पावसाळ्यात खवय्याची मज्जाच असते. मात्र हाच पावसाळा जेवढा आनंद घेऊन येतो तेवढाच टेन्शनही देणारा असतो. विशेषत: तुमच्या किचनमध्ये असणाऱ्या लाकडी वस्तूंची तुम्ही वेळीच काळजी घेतली नाही तर मात्र पावसाळा तुमच्यासाठी डोकेदुखी ठरु शकतो.

Kitchen Tips
Keys for Healthy Life: तुमच्या 'या' सवयी ठरतील निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली

लाकडी वस्तूंची काळजी घेतली नाही तर आरोग्यावर होतील विपरीत परिणाम

पावसाळयात हवेच्या आद्रतेची पातळी वाढते, आणि म्हणून पावसाळयात लाकूड (Wood)फुगतं आणि खराबही होऊ शकतं. हवेतील आर्द्रतेमुळे फर्निचरला बुरशी चढते. फर्निचरवरील बुरशीवर वेळीच उपाय केला नाही तर ती आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. अमेरिकन पर्यावरण रक्षण संस्थेच्या संशोधनानुसार बुरशीमुळे अ‍ॅलर्जी, अस्थमा, सतत शिंका येणे आणि अन्य श्वसनविकारांचा होऊ शकतात. त्यामुळे पावसाळ्यात लाकडी वस्तूंची काळजी घेणं आवश्यक आहे.

लाकडी वस्तूंची कशी काळजी घ्यावी यासाठी काही खास टिप्स तुमच्यासाठी..

स्वयंपाक घरात आपण लाकडी चमचे, पोळपाट, चॉपर बोर्ड अशा काही लाकडी वस्तू वापरतो. लाकडी चमच्यांबद्दल बोलायचं झालं तर स्वयंपाक करताना लाकडी चमच्यांना तेल(oil) लागतं. नुसतं धुतलं तरी तेल निघत नाही. तर पोलपाट आपण रोजच वापरतो. मात्र त्यांची नियमित स्वच्छता केली नाही तर आरोग्यासाठी घातक होऊ शकतं. त्यांना बुरशी लागू शकते. आणि हे आरोग्यासाठी धोकादायक असू शकतं. शिवाय चमच्यांना वास ही येतो. झुरळही लागु शकतात. पावसाळ्यात तर विशेष करून यात ओलावा जास्त राहतो यावर एक सोपा उपाय तुम्ही करु शकता, आठवड्यातून एकदा डीप क्लिनिंग करणे

डिप क्लिनिंग कसे करावे

एका पातेल्यात पाणी गरम करा. त्यात लिंबू(lemon) पिळा. खायचा सोडा मिक्स करा मग लाकडी चमचे त्यात ५ मिनिटं ठेवा. सर्व बाजू स्वच्छ झाल्यानंतर ५ मिनिटांमध्ये लाकडी चमचे, लाटणे बाहेर काढा. सर्व साहित्य स्वच्छ पुसून घ्या आणि वाळवून घ्या. पोटपाट आणि चॉपरसाठी हीच प्रोसेस थोडी वेगळी आहे. चॉपर किंवा पोळपाटवर बेकिंग सोडा टाका मग लिंबाच्या सालींनी पोटपाळ घासून घ्या. ५ मिनिटं तसचं ठेऊन मग पाण्यात धुवून घ्या आणि चांगले वाळवून घ्या. तुम्ही गरम गॅसवर ही थोडा वेळ वाळवू शकता

Kitchen Tips
Lifestyle For Slow Ageing : तिशीच्यानंतर 'या' गोष्टींच सेवन करणे टाळा, अन्यथा येईल अकाली वृद्धतत्व

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com