बाहेर जाताना कपड्यांवर परफ्यूम मारल्याशिवाय अनेकांना घराबाहेर पडावेसे वाटत नाही. मात्र, परफ्यूमच्या सुगंधासोबत कपड्यांवर पांढरे किंवा पिवळे डागही पडू शकतात. विशेषतः पांढऱ्या आणि हलक्या रंगाच्या कपड्यांवर हे डाग लगेच दिसून येतात. अनेकदा धुतल्यानंतरही हे डाग सहज निघत नाहीत. पण काळजी करू नका! काही सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही हे डाग कमी करू शकता.
कपड्यांवर नुकताच परफ्यूम मारला असेल आणि डाग पडला, तर सर्वप्रथम स्वच्छ टिश्यू पेपर किंवा कोरड्या कापडाने डाग हलक्या हाताने टिपून घ्या. डाग घासू नका. त्यानंतर त्या भागावर थंड पाणी शिंपडा. थोडे लिक्विड डिटर्जंट लावून हलक्या हाताने स्वच्छ करा आणि पुन्हा पाण्याने धुवा. कपड्यांवरील परफ्यूमचा डाग सुकला असेल, तर पाणी आणि पांढरे व्हिनेगर समान प्रमाणात मिसळा. हे मिश्रण डागावर लावून १० ते १५ मिनिटे ठेवा. त्यानंतर मऊ ब्रशने हलक्या हाताने स्वच्छ करा. शेवटी थंड पाण्याने कपडा धुवा.
तसेच पर्फ्युमच्या ऐवजी अत्तर लावला असेल आणि अत्तराचा डाग कपड्यांवर पडला असेल तर, डागावर थोडे कॉर्नस्टार्च किंवा टॅल्कम पावडर टाका. १५ ते २० मिनिटांनी पावडर काढून टाका. त्यानंतर थोडे डिशवॉश लिक्विड लावून कपडा स्वच्छ धुवा. सिल्क, सॅटिन आणि लेससारख्या कपड्यांवर कोणताही उपाय करताना आधी छोट्या आणि न दिसणाऱ्या भागावर चाचणी करा. अशा कपड्यांना जोरात घासू नका.
कपड्यांवर परफ्यूम मारण्याऐवजी आधी त्वचेवर परफ्यूम लावा आणि तो पूर्णपणे सुकल्यानंतर कपडे घाला. कपड्यांवर स्प्रे करायचाच असल्यास बाटली थोड्या अंतरावर ठेवा. थोडीशी काळजी आणि योग्य वेळी केलेली स्वच्छता यामुळे तुमच्या आवडत्या कपड्यांवरील परफ्यूमचे डाग कमी करण्यास मदत होऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.