Exam Stress 2024 : परीक्षेचा ताण कसा कमी करायचा? 'या' लक्षणांवरून तुमची स्थिती समजून घ्या

Exam Tension : नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये, बहुतेक मुलांच्या वार्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झालेले असते. सध्या फेब्रुवारी सुरू असला तरी 12 वी आणि 10 वीच्या विद्यार्थ्यांचे परिक्षेबाबतचा ताण खूपच वाढलेला दिसून येतो.
Exam Stress 2024
Exam Stress 2024Saam Tv
Published On

Exam Stress :

नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये, बहुतेक मुलांच्या वार्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झालेले असते. सध्या फेब्रुवारी सुरू असला तरी 12 वी आणि 10 वीच्या विद्यार्थ्यांचे परिक्षेबाबतचा ताण खूपच वाढलेला दिसून येतो. फेब्रुवारी दरम्यान 2023-24 च्या बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या ताणाचा सामना करावा लागतो आहे यात काही शंकाच नाही.

काही विद्यार्थ्यांना प्रत्येक परीक्षेपूर्वी परीक्षेचा ताण येतो. असे झाल्यावर त्यांना अभ्यासही करावासा वाटत नाही. जर तुम्हाला ही स्थिती टाळायची असेल, तर तुम्हाला परीक्षेचा ताण म्हणजे काय, त्याची लक्षणे (Symptoms) काय? ते कसे टाळता येतील हे जाणून घेतले पाहिजे.

परीक्षेचा ताण का येतो?

कोणत्याही परीक्षेपूर्वी एखाद्याच्या अभ्यासाविषयी तणावाच्या स्थितीला परीक्षेचा ताण म्हणतात. विद्यार्थ्यांच्या तयारीला कमी लेखणे, परीक्षेच्या निकालाबाबत अनिश्चितता, कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण, परीक्षेबाबत कुटुंब किंवा शिक्षकांकडून जास्त दबाव यामुळे विद्यार्थी परीक्षेच्या ताणावाला सामोरे जातात.

Exam Stress 2024
Board Exam Tips: आजच बदला या 5 सवयी, बोर्डाच्या परीक्षेत कराल टॉप

परीक्षेच्या तणावाची लक्षणे

परीक्षेच्या तणावामुळे विद्यार्थ्याला शारीरिक आणि मानसिक त्रास (Mental Health) होऊ शकतो. परीक्षेच्या तणावाची लक्षणे वेळीच समजून घेतल्यास, तुम्ही त्यातून मुक्त होऊ शकता.

परीक्षेच्या तणावाची शारीरिक लक्षणे -

  • जास्त घाम येणे

  • मळमळ, उलट्या किंवा जुलाब

  • पोटदुखी

  • हृदयाचे ठोके अचानक वाढणे

  • श्वास घेण्यास त्रास होणे

  • डोकेदुखी

  • अशक्तपणा जाणवणे

Exam Stress 2024
तुमच्याही मुलांना Exam Stress आहे? 'या' टीप्स फॉलो करा

परीक्षेच्या तणावाची भावनिक लक्षणे -

  • स्वत:वर शंका (परिणाम आणि तयारीबद्दल स्वतःवर विश्वास नसणे)

  • अपयशाची सतत भीती

  • सतत अनावश्यक तणाव जाणवणे

  • जास्त निराशा

  • प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींवर राग येणे

  • चिंताग्रस्त, अस्वस्थ वाटणे

परीक्षेच्या ताणावर मात कशी करावी?

  1. परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी तुमची अभ्यासाची पद्धत बदलण्याची गरज आहे. वेळापत्रक बनवा आणि त्याचे सतत पालन करा.

  2. तुमच्या अभ्यासक्रमाच्या छोट्या नोट्स तयार करा. तुम्हाला एखादा विषय कमी आवडला किंवा अवघड वाटत असेल तर त्यावर जास्त मेहनत करा.

  3. नोट्स तयार करताना हेडिंग आणि सब-हेडिंगकडे लक्ष द्या. तुम्ही हायलाइटर किंवा चार्ट देखील वापरू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com