दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी विविध शिक्षण मंडळांमधून लाखो विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. SSC, HSC, CBSE, UP, ICSE, ISC सह अनेक बोर्डांच्या परीक्षा फेब्रुवारी ते मे दरम्यान होणार आहेत.
10वी, 12वी बोर्ड परीक्षा 2024 ला बसलेल्या विद्यार्थ्यांनी या दिवसात संपूर्ण अभ्यासक्रमाची उजळणी करणं महत्वाचं आहे. यातच जर तुम्हाला 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असतील तर तुम्हाला तुमच्या सवयी आणि तयारीच्या पद्धतीत काही बदल करावे लागतील. याचबद्द आज आम्ही तुम्हा सांगणार आहोत... ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
बोर्ड परीक्षेत टॉपर होण्यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही, फक्त खाली नमूद केलेल्या 5 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. तुम्ही कोणत्याही बोर्डाचे विद्यार्थी असलात तरी या 5 गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही कोणत्याही परीक्षेत टॉप करू शकता. (Latest Marathi News)
1. अभ्यास करण्यास टाळाटाळ करू नका: बोर्डाच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वी उद्याचा अभ्यास पुढे ढकलण्याच्या सवयीपासून दूर राहा. बरेच विद्यार्थी ही चूक करतात. शेवटच्या क्षणी काहीही अभ्यास करण्यापेक्षा परीक्षेच्या काही दिवस आधी अंतिम उजळणी केल्यास तुम्हाला परीक्षेच्या वेळी ताण येणार नाही.
2.अभ्यासक्रमाकडे लक्ष द्या: बोर्ड परीक्षेच्या अभ्यासक्रमाकडे (Board Exam Syllabus) लक्ष न दिल्यास काही महत्त्वाचे विषय किंवा माहिती चुकू शकते. अभ्यास करताना नेहमी बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम समोर ठेवून बसा.
3. वेळेचे व्यवस्थापन महत्त्वाचे: एसएससी, एचएससी, सीबीएसई, आयसीएसई, आरबीएसईच्या कोणत्याही बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत असाल तर वेळेचे व्यवस्थापन करा. तुमच्या वेळेचा सदुपयोग करा आणि प्रत्येक विषयाकडे समान लक्ष द्या.
4. सोशल मीडियापासून दूर राहा: प्रत्येकाला सोशल मीडियावर वेळ घालवणे आवडतं. पण सोशल मीडियाचा वापर करताना वेळेवर नियंत्रण राहत नाही. अशातच तुम्ही वेळ वाया न घालवता त्याऐवजी तुमच्या वेळेची अभ्यासात गुंतवणूक करू शकता. जेणेकरून परीक्षेत तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतील.
5. तुमच्या खाण्याच्या आणि झोपेच्या सवयींमध्ये सुधार करा: बोर्ड परीक्षेच्या तयारीदरम्यान आरोग्यदायी आणि घरी शिजवलेले अन्न खाण्याची सवय लावा. या काळात तुम्ही तुमचे आरोग्य बिघडवण्याचा धोका पत्करू शकत नाही. एकाग्रता आणि चांगल्या स्मरणशक्तीसाठी 7-8 तासांची झोप घेणे देखील महत्त्वाचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.