Breast Cancer : ब्रेस्ट कॅन्सरचा आता पुरुषांनाही धोका, लक्षणे कोणती? काळजी कशी घ्याल?

Breast Cancer In Men : मिळालेल्या माहितीनुसार भारतीय महिलांमध्ये जितका स्तनाचा कर्करोग होण्याची संधी असते तितकेच पुरुषांमध्ये देखील असते. हा आजार गंभीर असला तरी पुरुषांना स्तानाचा कर्करोग होऊ शकतो.
Breast Cancer in Men
Breast Cancer in MenSaam Tv
Published On

Breast Cancer Symptoms :

स्तनाचा कर्करोग हा आजार जागतिक स्तरावर महिलांमध्ये आढळून येतो. हा आजार अल्पावधीत किंवा दीर्घकाळानंतर पुन्हा होऊ शकतो. या आजारात ५० टक्क्यांहून अधिक रूग्‍णांमध्‍ये निदानानंतर हा आजार पुन्‍हा होण्‍याचा दर ५ वर्षांचा आहे.

परंतु, मिळालेल्या माहितीनुसार भारतीय महिलांमध्ये जितका स्तनाचा कर्करोग होण्याची संधी असते तितकेच पुरुषांमध्ये देखील असते. हा आजार गंभीर असला तरी पुरुषांना स्तानाचा कर्करोग होऊ शकतो.

रायगडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने म्हणतात की, पुरुषांमध्येही ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे आढळून येतात. स्तनाच्या ठिकाणी गाठी झाल्यास ही कर्करोगाची (Cancer) लक्षणे (Symptoms) असू शकतात. वेळीच तपासणी करुन त्यावर उपचार घेणे देखील गरजेचे आहे.

Breast Cancer in Men
Heart Health : १ मिनिटात १०० पेक्षा जास्त वेळा तुमचं हृदय धडधडतंय? असू शकतो हा गंभीर आजार

पुरुषांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका अधिक असला तरी हा आनुंवाशिक आजार असतो. असे तज्ज्ञांनी मत मांडले आहे. कर्करोगाचे एकूण ९०० प्रकार आहेत. हा आजार डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत कुठेही होऊ शकतो. यामध्ये ब्रेस्ट, तोंडाचा गर्भाशय, पोटाचा, आतड्यांचा, फुफ्फुसाचा हे प्रमुख कर्करोगाचे प्रकार आहेत. कर्करोग हा कोणत्याही अवयवाला होऊ शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे.

1. लक्षणे कोणती?

  • एका स्तनाची वाढ

  • स्तनाग्र वेदना

  • स्तनाग्र पासून स्त्राव

  • स्तनाग्र किंवा अरेओला वर फोड

  • एक उलटे स्तनाग्र

  • अंडरआर्म लिम्फ नोड्स वाढवणे

  • वजन वाढणे

  • औषधे

  • मारिजुआना वापर

  • अतिप्रमाणात अल्कोहोलचे सेवन

    अशी लक्षणे दिसत असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

Breast Cancer in Men
Typhoid Disease : सतत जंक फूड खाताय? होऊ शकतो टायफॉइड, जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

2. आहार आणि व्यायाम महत्त्वाचा

कर्करोग झाल्यास व्यक्तीने चिंता, काळजी न करता तणावमुक्त राहाणे आवश्यक आहे. तसेच योग्य आहार (Food) घ्या. पुरेशी झोप घ्या. नियमितपणे व्यायाम, चालणे, धावणे अशा क्रिया करा. स्तनाच्या आतल्या पेशी वाढल्या की, गाठ तयार होते. याचा विस्तार झाल्यास धोका निर्माण होतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com