व्यायाम, शारीरिक हालचाल किंवा धावपळ केल्यास आपल्या हृदयाचे ठोके जलद होतात. परंतु, काही न करता तुमच्या हृदयाचे ठोके जलद झाले तर अशावेळी सावधगिरी बाळगायला हवी.
टाकीकार्डिया ही अशी स्थिती आहे की, ज्यामध्ये हृदय १ मिनिटात १०० पेक्षा जास्त वेळा धडधडते. यामध्ये हृदयाचे ठोके अनियमित होतात आणि ते आपल्याला जाणवू लागतात. सुरुवातीला त्याची लक्षणे (Symptoms) दिसू लागल्यावर डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले आहे. परंतु, ही समस्या गंभीर होऊ लागली की, चिंतेची बाब ठरू शकते. जर तुम्हाला हृदयाला पुरेशा प्रमाणात रक्तपुरवठा होत नाही तसेच स्ट्रोकची समस्या जाणवते.
1. टाकीकार्डियाची लक्षणे
टाकीकार्डिया हा कोणत्याही कारणामुळे वाढलेला हृदय गतीचा आजार आहे. व्यायाम किंवा तणावामुळे आपल्या हृदयाची गती अधिक जलद होते त्याला सायनस टाकीकार्डिया असे म्हणतात. सायनस टाकीकार्डिया हे एक लक्षण आहे. हृदयाच्या स्थितीमुळे विविध प्रकारचे टाकीकार्डिया होऊ शकते.
2. टाकीकार्डियाची लक्षणे
हृदयाचे ठोके अधिक जलद होणे
छातीत तीव्र भीतीची भावना
छातीत दुखणे
नाडीची हालचाल तीव्र होणे
श्वास घेण्यास अडचण
चक्कर येणे
टाकीकार्डियाच्या उपचारामध्ये हृदयाची गती जलद होते. यामध्ये औषधे, कार्डिओव्हेशन किंवा हृदयाची गती नियंत्रणात ठेवण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागते. यासाठी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.