High blood pressure: अचानक बीपी वाढलाय? या ५ पद्धतींनी लगेच कमी होईल रक्तदाब, डॉक्टरांनी दिल्या महत्त्वाच्या टीप्स

Hypertension tips: ब्लड प्रेशर अचानक वाढल्यास घाबरू नका. थंड पाणी, डीप ब्रीदिंग, पाणी पिणं आणि रिलॅक्स होणं यासारखे सोपे उपाय बीपी नियंत्रणात आणू शकतात. योग्य जीवनशैली आणि आहारामुळे हायपरटेंशनचा धोका कमी करता येतो.
High blood pressure
High blood pressureSAAM TV
Published On

आजकाल अनेकांना ब्लड प्रेशरचा त्रास जाणवू लागतो. केवळ प्रौढ व्यक्ती नाही तर तरूणांमध्येही ही समस्या आजकाल मोठ्या प्रमाणात दिसून येते. यावेळी अनेकांना क्षणात बीपी वाढल्यावर काय करावं हेच कळत नाही. अशा वेळी काही सोप्या उपायांनी तात्काळ तुम्ही तुमचं ब्लड प्रेशर नियंत्रणात आणू शकता.

उच्च रक्तदाब म्हणजेच हायपरटेंशन ही एक गंभीर समस्या मानली जाते. जर ही समस्या तुम्हाला दीर्घकाळ त्रास देत असेल तर रक्तवाहिन्यांवर त्याचा परिणाम होतो आणि हृदयविकार, हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो. त्यामुळे वेळेवर बीपी नियंत्रणात ठेवणं खूप गरजेचं आहे. याबाबत सोशल मीडियावरून डॉ. शालिनी सिंह सालुंके काही सोपे महत्त्वाचे उपाय सांगितलेत.

बीपी अचानक वाढल्यास काय करावं?

चेहऱ्यावर थंड पाणी मारा

जर तुमचं ब्लड प्रेशर अचानक वाढलं तर चेहऱ्यावर थंड पाणी मारा. असं केल्यास शरीरातील पॅरासिंपथेटिक नर्व्हस सिस्टीम एक्टिव्ह होते. त्यामुळे शरीर रिलॅक्स होतं आणि ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते.

High blood pressure
Heart attack morning risk: सकाळी ६ ते १० या वेळेतच का येतो हार्ट अटॅक? कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

एक ग्लास पाणी प्या

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, अनेकदा डिहायड्रेशनमुळेही बीपी वाढू शकतो. त्यामुळे अशा वेळी एक ग्लास पाणी प्यायल्याने शरीरातील लिक्विड बॅलन्स होतो. त्यामुळे बीपी कमी होण्यास मदत मिळते.

सरळ बसून रिलॅक्स होणं

बीपी वाढल्यावर लगेचच सरळ बसून पाय पुढे करून शांत राहावं. यामुळे शरीराला आराम दिल्यास बीपीचा अचानक वाढलेला स्तर कमी होऊ शकतो.

डीप ब्रीदिंग करा

जर तुमचा बीपी अचानक वाढला असेल तर तुम्ही डीप ब्रिदींगचा वापर करू शकता. यामध्ये ४-७-८ या पद्धतीने दीर्घ श्वास घेणं फायदेशीर ठरतं. यामुळे नर्व्हस सिस्टीम शांत होते आणि बीपी नियंत्रणात येतो.

High blood pressure
Breast cancer India: महिलांनो वेळीच सावध व्हा! चुकीच्या सवयींमुळे 30 वयात वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका

तणावापासून दूर राहा

ज्या गोष्टींमुळे ब्लड प्रेशर वाढतं त्या गोष्टींपासून दूर राहणं गरजेचं आहे. मोबाईलपासून थोडा वेळ दूर राहणं, वाद टाळणं, मोठ्या आवाजापासून दूर राहणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.

हाय ब्लड प्रेशरची लक्षणं

  • डोकं दुखणं

  • छातीत जडपणा जाणवणं

  • चक्कर येणं

  • गोंधळल्यासारखं वाटणं

  • अशक्तपणा

  • नाकातून रक्त येऊ शकतं

  • हृदयाची धडधड वाढणं

High blood pressure
Liver tumor: लिव्हरमध्ये गाठ तयार झाल्यावर शरीर कसं सांगतं? ही महत्त्वाची 5 लक्षणं जाणून घ्या

कशी घ्याल स्वतःची काळजी?

जर वारंवार ब्लड प्रेशर वाढण्याचा त्रास जाणवत असेल तर आहारात मीठ कमी करणं गरजेचं आहे. दररोज व्यायाम करण्याची सवय लावा. तसंच मद्यपान टाळणं आणि धूम्रपान कमी करणं फायदेशीर ठरतं. अशावेळी वजन नियंत्रणात ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com